पेमगिरी हे महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातले गाव आहे.या गावात शहागड हा डोंगरी किल्ला आहे. या ठिकाणी शहाजी महाराज मुर्तजा नावाच्या छोट्या निजामला मांडीवर घेऊन सिंहासणाधिष्ट झाले ही घटना सन 1633मधील ह्रिषीपंचमीला घडली.1633 ते 1636असे 3वर्ष त्यांनी राज्य केले. अश्या पद्धतीने हिंदवी स्वराज्याचा संकल्प या गडावर घेतला गेला म्हणून संगमनेर तालुक्याततील या गावाला स्वराज्य संकल्प भूमी असे म्हणतात .

पेमगिरीचा किल्ला
पेमगिरीचा किल्ला
पेमादेवीचे मंदिर
पेमादेवी

एक अक्षं. १९'४६" रेखांश ७४'०९"

  • पेमगिरी गावाजवळ जुन्याकाळी चुन्याच्या खानी प्रसिद्ध होत्या. त्याकाळी चुन्यात येथील येळुशीच्या दऱ्यातील 'पेमगिरी' कंद चुना प्रसिद्ध होता.
  • पेमगिरी गावात एक शिवकालीन पायऱ्यांची विहीर (बारव)आहे. तीत एक शिलालेखही आहे.
  • गावाच्या शेजारी १.५ हेक्टर आकाराचे एक प्राचीन प्रसिद्ध वडाचे झाड आहे.हा वटवृक्षा महाराष्ट्रातील सर्वात मोठा व भारतातील तिसरा सर्वात मोठा वटवृक्ष आहे.
  • शहागडावर पेमादेवीचे पुरातन मंदिर आहे. व पाण्याची सातवाहन कालीन टाके आहेत.
  • गावाच्या माध्यभागी चार माजली सागवानी सुंदर मारुती मंदिर असून शेजारी भारतातील सर्वात उंच गदा आहे. समोर प्रती शनि शिंगणापूर असलेले शनि मंदिर आहे.
  • गावाच्या पूर्वेला स्वातंत्र्य सेनानी प्रल्हाद दीक्षित यांचे स्मारक आहे.
  • या गावाच्या चारही बाजूला असलेल्या डोंगरावरून पावसाळ्याच्या उत्तरार्धात अनेक धबधबे कोसळतात.
  • हे गाव बिबट्या, मोर,, कोल्हे, लांडगे, ससे, खोकड अश्या जैवविविधतेने समृद्ध आहे.

वैशिष्ट्य

संपादन

पेमगिरीचा किल्ला म्हणून ओळखला जाणारा भीमगड किंवा शाहगड इ.स. २०० मध्ये यादव राजांनी बांधला [ संदर्भ हवा ]. या किल्ल्यावर पेमादेवीचे मंदिर असून पाण्याची टाके आहेत. दिल्लीचा मुघल सम्राट शाहजहान आणि विजापुराची आदिलशाही या दोन सत्तांनी मिळून निजामशाही संपवली, त्यावेळी मूर्तझा या अल्पवयीन असलेल्या निजामशाहीच्या वारसदाराला गादीवर बसवून मराठा सुभेदार शहाजीराजे भोसल्यांनी पेमगिरीच्या शाहगडावरून ३ वर्षे राज्यकारभार हाकला.