पूजा धिंगरा (जन्म १९८६) ही भारतीय पेस्ट्री शेफ आणि महिला व्यवसायिक आहे. तिने भारतातील पहिले मॅकरॉन स्टोअर उघडले. ही "ले१५ पेट्रीझरी" या मॅकरॉन आणि फ्रेंच मिठाई साठी प्रसिद्ध असलेल्या बेकरीची मालकिण आहे. या बेकरीच्या बऱ्याच शाखा आहेत.[]

२०१५ मधील ऑडी इंडियाच्या #स्टार्टयंग मोहिमेसाठी पूजा धींग्रा.

चरित्र

संपादन

पूजाचा जन्म पाककलेत रूची असणाऱ्या कुटुंबात झाला. तिचे वडील आणि तिचा भाऊ वरुण धिंग्रा दोघेही उपहारगृहांचे मालक आहेत. लहान असतानाच पूजा आईकडून बेकिंगची कला शिकली. [] तिने सुरुवातीला मुंबईच्या लॉ स्कूलमध्ये प्रवेश घेतला परंतु २००४ मध्ये तिने कायद्याचे शिक्षण सोडून दिले. नंतर आपली कारकीर्द बदलत स्वित्झर्लंडच्या ले बोव्हरेटच्या सीझर रिट्झ स्कूलमध्ये हॉस्पिटॅलिटी अँड मॅनेजमेंट कोर्समध्ये प्रवेश घेतला. [] तीन वर्षांनंतर तिने पॅरिसमधील ले कॉर्डन ब्लेयू येथे प्रशिक्षण सुरू केले. [][] तेथे ती पियरे हर्मेच्या पॅटीसरीजपैकी एका बेकरीमध्ये पहिल्यांदा तिची मॅकरॉनशी ओळख झाली. [] आपला अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर, पूजा मुंबईत परतली आणि भारतीयांना पॅरिशिअन शैलीतील पाककलेचा अनुभव देण्याच्या एकमेव उद्देशाने मार्च २०१० मध्ये तिने पहिले दुकान उघडले. [] २०१६ मध्ये, दक्षिण मुंबईतील "ले 15 कॅफे" नावाचे एक नवीन दुकान उघडत पूजाने आपला उद्योग वाढविला. कॅफेच्या मेनूमध्ये फ्रेंच महिलांच्या ओळखल्या जाणाऱ्या विशेष मिठायांबरोबरच साधे तिखटामीठाचे पदार्थही आहेत.[] २०१० मध्ये जेव्हा तिने मुंबईत व्यवसाय सुरू केला तेव्हा तिच्याकडे फक्त दोनच कर्मचारी होते. ऑक्टोबर २०१४ पर्यंत तिच्याकडे तब्बल ४२ कर्मचारी होते. तिची महत्त्वाकांक्षा संपूर्ण भारतभर आपल्या शाखा उघडण्याची आहे.[]

तिच्या पाकाकलेतील कौशल्याबद्दल राष्ट्रीय दैनिकात तसेच फॅशन आणि जीवनशैलीविषयक नियतकालिकांत विविध लेख प्रकाशित झाले ज्याद्वारे एक प्रगतिशील व्यावसायिक महिला म्हणून स्त्रियांसाठी प्रेरणा ठरते आहे. तिला फोर्ब्स इंडियाने त्यांच्या '३० अंडर ३०' आणि फोर्ब्स आशियाने त्यांच्या '३० अंडर ३०' साठी निवडले आहे.

तिने 'द बिग बूक ऑफ ट्रीट्स' व 'द होलसम किचन' ही दोन पुस्तके लिहिली आहेत. []

रणविर ब्रार आणि विकास खन्ना यांच्या सह परीक्षक म्हणून मास्टरशेफ इंडिया - हिन्दी च्या ८व्या पर्वात पूजा सहभागी झाली आहे.[]

प्रकाशने

संपादन
  • द बिग बूक ऑफ ट्रीट्स: पेंग्विन बुक्स इंडिया, २०१४. आयएसबीएन-13 978-0143422686.
  • द होलसम किचन: हॅचेट बूक पब्लिशिंग इंडिया प्रा. लि. २०१७. आयएसबीएन-13 978-9351951445

संदर्भ

संपादन
  1. ^ a b c Pandya, Kinjal (15 February 2015). "India's 'macaron queen'". BBC News. 16 February 2015 रोजी पाहिले.
  2. ^ a b c Pirolt, Sabine (30 October 2014). "La femme qui régale tout Bollywood" (PDF) (French भाषेत). L'Hebdo: Cesar Ritz Colleges. p. 61. 2016-08-16 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 18 July 2016 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ Sharma, Milan (11 July 2011). "Macaroons make Pooja Dhingra's cash register ring". The Economic Times. 2015-02-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 16 February 2015 रोजी पाहिले.
  4. ^ K., Bhumika (19 June 2014). "Miss Macaron". The Hindu. 16 February 2015 रोजी पाहिले.
  5. ^ Chanda, Kathakali (19 February 2014). "Pooja Dhingra: Bringing Macarons to Mumbai". Forbes India. 2015-02-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 16 February 2015 रोजी पाहिले.
  6. ^ Vij, Gauri (11 February 2016). "Where sweet and savoury meet". The Hindu. Chennai, India. 17 July 2016 रोजी पाहिले.
  7. ^ "'MasterChef India': Pooja Dhingra joins Vikas, Ranveer as judge in new season". India Today (इंग्रजी भाषेत). 2023-11-10 रोजी पाहिले.