पुराभिलेखागार (इंग्लिश: Archive, आर्काइव्ह) म्हणजे कागदपत्रांचा दप्तरखाना होय.

वर्गीकृत केलेले व रचून ठेवलेले पुराभिलेख

व्युत्पत्तिसंपादन करा

मराठीत पुरा म्हणजे जुने, प्राचीन, अभिलेख म्हणजे कागदपत्र, तर आगार म्हणजे साठवणुकीची जागा होय. या शब्दांवरून "जुन्या कागदपत्रांच्या साठवणुकीचे आगार" अशा अर्थाचा पुराभिलेखागार हा शब्द तयार झाला आहे.

पुराभिलेखागारसंपादन करा

महाराष्ट्रातील पुराभिलेखागारसंपादन करा

महाराष्ट्र पुराभिलेखागाराला इ.स. २०११ मध्ये १९० वर्षं पूर्ण झाली. हे मुंबईच्या फोर्ट भागातील एलफिन्स्टन महाविद्यालयाच्या इमारतीत आहे. त्यात मराठा साम्राज्य, इ.स. १८५७चा उठाव, भारतातील ब्रिटिश राजवट ते भारतीय स्वातंत्र्यचळवळीचा संपूर्ण इतिहास आहे. या पुराभिलेखागारातला पहिला कागद इ.स. १६३० सालचा आहे. महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेखागार विभागाने ठिकठिकाणची दप्तरे (विविध सरदार घराणी, महाराष्ट्रातील विविध संस्थानांकडे असलेले कागदपत्रांचे रुमाल) आपल्याकडे घेतली. त्यामुळेच आज केवळ ब्रिटिश आमदनीतलाच नव्हे, तर मराठा साम्राज्य, निजामशाही अशा वेगवेगळ्या कालखंडातील दस्तऐवज महाराष्ट्र पुराभिलेखागाराकडे आहेत. यात प्रामुख्याने मोडी लिपीतील दस्तऐवज आहेत.

हेही पहासंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा

  • "महाराष्ट्राचा दप्तरखाना".


बाह्य दुवे (परभाषी)संपादन करा


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.