पुनीत कौर

भारतीय रोलर स्केटर

पुनीत कौर (जन्म १३ फेब्रुवारी १९८७ - लुधियाना, पंजाब) ही एक भारतीय रोलर स्केट खेळाडू आहे. तिने २००४ मध्ये भारतीय रोलर स्केटिंग फेडरेशन आयोजित प्रथम राष्ट्रीय रौप्य पदक जिंकले.[]

क्रीडा कारकीर्द

संपादन

१९९६ मध्ये कौरने तिच्या सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट शाळेमध्ये रोलर स्केटिंग गटात प्रवेश करण्यास सुरुवात केली.१९९७ मध्ये तिने पहिले पदक जिंकले आणि तिने लुधियाना येथे जिल्हा रोलर स्केटिंग चँपियनशिपमध्ये ३०० मीटर आणि ५०० मीटरच्या गटात दोन कांस्यपदक मिळवले. १९९७ मध्ये तिची राज्यस्तरीय रोलर स्केटिंग टूर्नामेंटमध्ये निवड झाली. २००२ साली कोलकाता येथे झालेल्या राष्ट्रीय चँपियनशिपसाठी तिने पात्र ठरले जिथे तिने  पंजाबचे प्रतिनिधित्व केले. २००४ मध्ये, ४२ व्या राष्ट्रीय स्पर्धेत तिने ३०० मीटर स्पीड स्केटिंग प्रकारात रौप्य पदक जिंकले.[]

पुरस्कार

संपादन

४२ व्या राष्ट्रीय स्पर्धेत रौप्य पदक विजेता, भारतीय रोलर स्केटिंग फेडरेशन (आरएसएफआय)

संदर्भ

संपादन
  1. ^ "The Story of an Athlete, Puneet Kaur". in.news.yahoo.com (इंग्रजी भाषेत). 2021-02-28 रोजी पाहिले.
  2. ^ Team, Author: Editorial (2021-02-22). "Puneet Kaur, a Prodigy in Roller Skating". IWMBuzz (इंग्रजी भाषेत). 2021-02-28 रोजी पाहिले.