पुत्रंजीवा, पुत्रंजीवा किंवा पुतजन हा एक वृक्ष आहे.

Rosa hirtula
Rosa roxburghii flower

उन्हाळ्यात शुष्क हिरवा,पावसाळ्यात गर्द हिरवा आणि हिवाळ्यात गर्द हिरवा असा पर्णसंभार असतो.याची उंची ५०-६० फुट असते.अशा झाडांचा बुंधा घेरदार असतो.त्याला ठिकठिकाणी गाठींची सूज दिसते.एरंडकुळातील हा वृक्ष आहे.पानांचा हिरवागर्द रंग फांद्यां लटकदार,उतरत्या असल्यामुळे जास्तच हिरवा दिसतो.यामुळे वेगवेगळे पक्षी या झाडावर घरटे बांधतात.पावसाळ्यात पानांचा आकार लांबट असतो.साधारण अर्ध्यावितिएवढी लांब व अंगठ्याएवढी रुंद पाने फांदीपासून जवळ असतात.त्यांच्या खाचांत मंद वासाची झुपकेदार पिवळी नरपुष्पे व विरळ पांढरट स्रीपुष्पे असतात.फळे लांबटगोल करवंदाच्या आकाराची असतात.संस्कृतमध्ये पुत्रंजीवा असे समर्पक नाव दिले आहे.बियांच्या माळा करून मुलांच्या गळ्यात घालतात त्यामुळे बालकांचे रक्षण होते असा समज आहे म्हणून पुत्रंजीवा असे नाव आहे.पानांचा काढा सूज आणि वेदना कमी करण्यासाठी वापरला जातो.फोर्ट परिसर,कुलाबा,मलबारहिल परिसर,दादर-माहीम-माटुंगा-प्रभादेवी,सावरकर मार्ग,शिवाजी पार्क,आंबेडकर मार्ग अशा विविध ठिकाणी पुत्रंजीवा हा वृक्ष आढळतो.

Tree line towards Triund peak, above McLeod Ganj

संदर्भ

संपादन

वृक्षराजी मुंबईची डॉ.शेखर लेले