पुणे ईट आउट्स
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
पुणे इट आउट्स हा पुणेरी खाद्य संस्कृतीला आधुनिक स्वरूप देणारे एक उत्कृष्ट व्यासपीठ आहे. [१] [२]पुणेकरांच्या बाण्याबरोबरच पुणेकरांची खवय्येगिरी सर्वश्रुत असल्याने खाद्य चर्चा आणि त्याचसोबत पुण्यातील नवनवीन रेस्टॉरंट्स, उदयोन्मुख शेफ, होम बेकर्स यांच्या कलेची माहिती सर्वदूर पोहोचविणे हाच त्यामागील उद्देश आहे.
इतिहास
पुणे ईट आऊट्स, हा खाद्यपदार्थ, रेस्टॉरियर्स, होम शेफ, मीडिया कर्मचारी आणि फूड ब्लॉगर्सचा एक संपन्न समुदाय आहे. त्याला १५ वर्षे पूर्ण होत आली आहेत. अनिरुद्ध पाटील यांनी १५ वर्षांपूर्वी पुणेरी खाद्यपदार्थांच्या अनुभवांची नोंद करून लिहायला सुरुवात केली, आणि त्यामुळेच आज पुणे ईट आउट्स हा जवळपास १.६८ लाखापेक्षा जास्त लोकांचा फेसबुक समुदाय बनला आहे.[३] अनिरुद्ध पाटील यांची अन्नाप्रती असलेली आवडच त्यांना हा ग्रुप सूरु करण्यास प्रेरणा देऊन गेली. [४] [५] [६]
पुणे ईट आऊट्सला २००५ साली सर्वप्रथम ऑरकुट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून सुरुवात झाली. त्यांनतर २००९ मध्ये फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या ग्रुपची सुरुवात झाली. सुरुवातीला या ग्रुपचा उपयोग इतर लोकांना पुणे शहरात मिळणाऱ्या उत्कृष्ट खाद्यपदार्थांची सफर घडवून आणण्यासाठी केला जात होता. हळू हळू माणसे आवडीने हा ग्रुप जॉईन करत गेली आणि पुणे ईट आऊट्सचा परिवार वाढत राहिला.[७]
भविष्यातील योजना
पुणे ईट आऊट्सचा परिवार जसजसा वाढत गेला तसतसे त्यामध्ये कालानुरूप बदल घडून आले. पुणेरी संस्कृती पुणेकरांनी जशी जगभर पसरवली तसेच पुण्याचे खाद्यप्रेम सर्वदूर व्हावे यासाठी पुणे ईट आऊट्स वेबसाईटची निर्मिती करण्यात आली. आज पुणे ईट आऊट्सच्या वेबसाईटवर पुण्यातील अनेक हॉटेल्सची व रिसॉर्ट्सची माहिती उपलब्ध आहे. पुणे ईट आऊट्स वेबसाईटला भरभरून मिळालेल्या प्रतिसादानंतर पुणे ईट आऊट्सच्या शिरपेचातील एक मानाचा तुरा म्हणजे पुणे 'ई-ऑर्डर्स'ची निर्मिती. आज पुणे ई-ऑर्डर्स वर उपलब्ध असलेल्या अनेक रेस्टॉरंट मधून पुणे ई-ऑर्डर्सच्या माध्यमातून कोणत्याही कमिशन आणि अतिरिक्त शुल्काशिवाय पुणेकरांच्या खवय्येगिरीची पूर्तता केली जाते. याशिवाय पुण्यातील अनेक होम शेफ आणि लहान फूड ऑपरेटर्स जे ग्राहकांपर्यंत सहज पोहचू शकत नाहीत अशा अनेक लोकांसाठी पुणे ई-ऑर्डर्सच्या निमित्ताने एक खात्रीशीर व्यासपीठ उपलब्ध आहे.
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ Oct 10, Anurag BendeAnurag Bende / Updated:; 2019; Ist, 06:00. "Scamster nearly dupes people for reserving table at popular eatery". Pune Mirror (इंग्रजी भाषेत). 2019-10-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-12-17 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
- ^ "Trade Marks Journal" (PDF). ipindia. 7 February 2019. 17 December 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF).
- ^ Singh, Debarati Palit. "A foodie's world". The Bridge Chronicle - Breaking News | Politics, Sports, Business, Lifestyle News from India & World. 2020-12-17 रोजी पाहिले.
- ^ Patil, Aniruddha. "Aniruddha Patil". GreenEntrepreneur (इंग्रजी भाषेत). 2021-09-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-12-17 रोजी पाहिले.
- ^ Sharma, Bhakti (28 June 2016). "How do food critics and reviewers stay fit?". thehealthsite.
- ^ Joshi, Prajakta. "Pune: Now food businesses get a commission-free local delivery platform – PunEOrders". 2021-04-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 9 August 2020 रोजी पाहिले.
- ^ Patil, Nandini. "पुणेकर अनिरुद्ध पाटील यांच्या मुलुखावेगळ्या सोशल खवय्येगिरीतून नवा उद्यम! अर्थात पीईओ". Yourstory. 20 Oct 2016 रोजी पाहिले.