पुंजगुणक हा जालाचे एक गुणवैशिष्ठ्य आहे. आपण विचारात घेतले असणारे जाल किती प्रमाणात पुंजक्यांसारखे जोडले गेले आहे हे पुंजगुणकाच्या किंमतीवरून लक्षात येते. पुंजगुणकाची न्युनतम किंमत ० असु शकते आणि अधिकतम किंमत १ असु शकते. जगातिल विविध जालांविषयी आत्तापर्यंत जी माहिती गोला करण्यात आली आहे त्यावरून असे दिसते कि यांपैकी बऱ्याच जालांमध्ये आणि विशेषतः सामाजिक जालांमध्ये शिरोबिंदुंचे असे छोटे छोटे समुह आहेत ज्या समुहांतिल खुपसे शिरोबिंदु एकमेकांशि जोडले गेले आहेत. []

जालामधील प्रत्येक शिरोबिंदूसाठी पुंजगुणकाची किंमत काढता येते. सगळ्या शिरोबिंदूंची सरासरी किंमत हा त्या जालासाठीचा पुंजगुणक होय. एका विशिष्ट शिरोबिंदूचा पुंजगुणक अशा प्रकारे व्याख्यित केला जातो : अ या शिरोबिंदूला जालामध्ये ५ शेजारी आहेत असे समजू. या ५ शेजारी एकमेकांशी जोडलेले असू शकतात. त्यांमध्ये जास्तीत जास्त १० दुवे असू शकतात (५ गुणिले ४ भागिले २). असे समजू की दिलेल्या जालामध्ये या ५ शिरोबिंदूंमध्ये मिळून एकूण केवळ ५ दुवे आहेत. तर या शिरोबिंदूचा पुंजगुणक ५/१० = ०.५ इतका असेल.

संदर्भ

संपादन
  1. ^ P. W. Holland आणि S. Leinhardt. "Transitivity in structural models of small groups". Comparative Group Studies. 2: 107–124.