पीर पंजाल रेल्वे बोगदा

पीर पंजाल रेल्वे बोगदा भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यामधील एक महत्त्वाचा बोगदा आहे. जम्मू–बारामुल्ला रेल्वेमार्गावरील बनिहालकाझीगुंड ह्या शहरांना जोडणारा हा बोगदा ११.२१५ किमी (६.९६९ मैल) लांबीचा असून तो आजच्या घडीला भारतामधील सर्वाधिक लांबीचा तर आशिया खंडातील चौथ्या क्रमांकाच्या लांबीचा रेल्वे बोगदा आहे. जानेवारी २०१३ मध्ये हा बोगदा रेल्वे वाहतूकीस खुला करण्यात आला. ह्या बोगद्याची समुद्रसपाटीपासून सरासरी उंची १,७६० मी (५,७७० फूट) इतकी आहे. हा बोगदा काश्मीर खोऱ्याला जम्मू आणि उर्वरित भारतासोबत जोडणारा एक महत्त्वाचा दुवा असून जम्मू-बारामुल्ला मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर ह्या बोगद्याद्वारे जम्मू ते श्रीनगर रेल्वे वाहतूक शक्य होईल.

पीर पंजाल रेल्वे बोगदा

गुणक: 33°30′45″N 75°11′50″E / 33.5124345°N 75.1970923°E / 33.5124345; 75.1970923