पित्ताशय (इंग्लिश: Gallbladder (गॉलब्लॅडर), cholecyst (कोलिसिस्ट) ;) हा पृष्ठवंशी प्राण्यांच्या उदरपोकळीतला, अन्नाच्या पचनास मदत करणारा महत्त्वाचा अवयव आहे. यकृताने निर्मिलेले पित्तरस यात साठवले जाते.

पचनसंस्थेतील अन्य अवयवांसह पित्ताशयाचे स्थान दर्शवणारे चित्र (मजकूर: इंग्लिश)

आकार संपादन

याचा आकार नासपतीच्या फळासारखा असतो. हे यकृतास व खालच्या बाजूस लहान आतड्याला जोडलेले असते.

कार्ये संपादन

यकृतातील पित्तरसाचे पाण्याचा अंश कमी करून स्निग्धांशाच्या पचना योग्य बनवने व खालच्या बाजूस लहान आतड्याला गरजेनुसार पुरवणे.

पित्ताशयाचे आजार संपादन

 
पित्ताशयातील बिलिरुबिन व कॅल्शियमयुक्त खडे
 
पित्ताशयातील कॉलेस्टेरॉलयुक्त खडे
  • पित्ताशयातील खडे- पित्ताशयाच्या पिशवीसारख्या भागात पित्तरसातील पाणी कमी केले जाते, त्यावेळी काही रसायनांचे खडे तयार होतात. हे कॉलेस्टेरॉल किंवा बिलिरुबिन व कॅल्शियमचे खडे तयार होतात.
  • पित्ताशयाला सुज- पित्ताशयाला जंतुसंसर्गामुळे सुज येते.
  • पित्ताशयातील पॉलीप

उपचार संपादन

पित्ताशयात खडे झाल्यास आणि त्यामुळे पित्ताशायाच्या नलिकेत अवरोध उत्पन्न होऊन कावीळ निर्माण झाल्यास शस्त्रक्रिया करून पित्ताशय काशून टाकावे लागते. कुठलीही शस्त्रक्रियाना करता आपोआप पित्ताशयातील खडे निघून जाऊ शकतात.

बाह्य दुवे संपादन