पित्त ही आयुर्वेदात वर्णन केलेली एक संकल्पना आहे. शरीरातील पचन / रूपांतरण करणाऱ्या घटकास पित्त असे म्हणतात आयुर्वेदात वर्णन केलेल्या तीन दोषांपैकी एक दोष.

पित्ताची निर्मिती जल आणि अग्नी या तत्त्वांपासून होते असे मानले जाते. पित्त शरीरातील उष्णता, चयापचय, मन आणि शरीर यांचे रूपांतरण, अन्नपचन, संवेदना, सदसदविवेकबुद्धी इत्यादी गोष्टींवर नियंत्रण ठेवते. संतुलित पित्ताने नेतृत्व गुण (leadership characteristics) विकसित होतात.

अती पित्तामुळे राग, आलोचना, व्रण, पुरळ इत्यादी त्रास होतात.