पिंपळगाव (खडकी)
पिंपळगाव (तर्फे महाळुंगे) हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील, पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात वसलेले घोड नदीच्या काठावरचे एक गाव आहे.[ दुजोरा हवा] गावची लोकसंख्या किमान सहा हजाराच्या आसपास आहे.[ संदर्भ हवा ]
स्थान
संपादनपिंपळगाव तर्फे महाळुंगे हे गाव मंचर पासून 5 कि.मी पुर्वेकडे वसलेले आहे. ,
गावाच्या चतुःसीमा
संपादनपुर्वेस :- निरगुडसर
पश्चिमेस:- चांडोली, मंचर
उत्तरेस:- खडकी
दक्षिणेस:- अवसरी खुर्द
गाव आणि शिवार
संपादनगावचे क्षेत्रफळ 696.81 हेक्टर पैकी गायरान 34.62 हेक्टर व लागवडीलायक क्षेत्र 602.38 हेक्टर आहे.ग्रामदैवत मुक्तादेवी मंदिर, श्रीराम मंदिर, श्री हनुमान मंदिर, आणि श्री कमलजादेवी अशी अनेक देव-देवतांची मंदिरे आहेत.
ग्रामपंचायत
संपादनगावाला स्वतंत्र ग्रामपंचायत सन 1953 साली स्थापन झाली. ग्रामपंचायतीमध्ये एकूण 12 सदस्य आहेत. गावाला आजपर्यंत अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत.
नद्या, नाले, तलाव
संपादनपिंपळगाव तर्फे महाळुंगे गावाला पश्चिम पुर्व वाहणारी घोडनदी लाभलेली आहे. शेजारील गावाला लाभलेल्या भव्य तटामुळे नदीचा परिसर शोभिवंत वाटतो.
येण्या-जाण्याचे मार्ग
संपादनमंचरमार्गे ->पिराचा मळा->पिंपळगाव तर्फे महाळुंगे
अवसरीमार्गे-> लिंबाचा मळा->पिंपळगाव तर्फे महाळुंगे
खडकीमार्गे-> पुल ओलांडुन->पिंपळगाव तर्फे महाळुंगे
निरगुडसरमार्गे-> गव्हाळीमळा->पिंपळगाव तर्फे महाळुंगे