पिंगल तिरचिमणी (इंग्लिश:Tawny Pipit; हिंदी:चिल्लू) हा एक पक्षी आहे.

पिंगल तिरचिमणी

मध्यम आकाराच्या चिमणीएवढी असते. वरील भागाचा रंग पिवळट तपकिरी. त्यावर विरळ रेषा. शेपटीची किनार पांढरी. खालील भागाचा रंग पांढुरका-पिवळट. क्वचितच छातीवर गर्द रेषा. नर-मादी दिसायला सारखे असतात.

वितरण

संपादन

पाकिस्तानच्या भागात कोहटपासून पंजाब, सिंध आणि बलुचिस्तान आणि भारतीय द्वीपकल्प, पूर्वेकडे बांगला देशातील ब्रह्मपुत्रा नदी, उत्तरेकडे कांग्रा, सिमला आणि देहरादून यांच्या पायथ्यावरील भागांत हिवाळी पाहुणे.

निवासस्थाने

संपादन

झुडूपी माळराने, निमवाळवंटी प्रदेश, पडीक राने, गायराने आणि नांगरलेली शेती.

संदर्भ

संपादन
  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली