पॉल रत्नासामी
(पाल रत्नासामी या पानावरून पुनर्निर्देशित)
डॉक्टर व शास्त्रज्ञ .असलेल्या पॉल रत्नासामी ( ११ जून, इ.स. १९४२), ह्यांना सप्टेंबर २५ १९९९ रोजी एच.के. फिरोदिया पुरस्कार जाहीर झाला. २००१ मध्ये त्यांना पद्मश्री मिळाली.
पॉल रत्नासामी यांनी मद्रासमधील लॉयोला कॉलेजातून १९६७ साली पीएच.डी घेतली आणि ते पुढील शिक्षणासाठी न्यू यॉर्कमधील क्लार्कसन कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत दाखल झाले (१९६७-६९). नंतर १९६९ ते १९७२ या काळात ते बेल्जियममधील कॅथॉलिक युनिव्हर्सिटीत संशोधन करीत होते. इ.स. १९७९ मध्ये ते पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत काम करू लागले. जून २००२ मध्ये ते तेथून निवृत्त झाले.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |