पार्कफील्ड (कॅलिफोर्निया)
पार्कफील्ड हे अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील मॉंटेरे काउंटीमध्ये असलेले वस्तीवजा शहर आहे. २००७ च्या माहितीनुसार येथील लोकसंख्या १८ आहे.
हा भाग सान अँड्रियास फॉल्ट वर असून येथील आसपासच्या प्रदेशात दर १२-३२ वर्षांनी मोठे भूकंप होतात. १८५७ ते १९६६ पर्यंत सरासरी २२ वर्षांनी हे धक्के बसतात. सगळ्यात अलीकडे २८ सप्टेंबर, इ.स. २००४ रोजी येथे रिश्टर मापनपद्धतीनुसार ६.० तीव्रतेचा भूकंप झाला होता.