पायथॉन (आज्ञावली भाषा)

निःसंदिग्धीकरण पाने
(पायथॉन आज्ञावली भाषा या पानावरून पुनर्निर्देशित)

पायथॉन ही एक उच्चस्तरीय[] भाषा आहे. १९९१मध्ये ती प्रथम प्रकाशित झाली.

पायथॉन [Python]
रचनाकार गायडो वान रोस्सूम
विकसक पायथॉन सॉफ्टवेर फॉऊंडेशन
धारिका प्रकार .py, .pyc, .pyd, .pyo, .pyw
मुख्यप्रत प्रमाणपत्र पायथॉन सॉफ्टवेर फॉऊंडेशन प्रमाणपत्र
www.python.org

पायथॉनची सध्याची आवृत्ती ३.६.३ आहे. पायथॉन २.७ आणि ३ मध्ये बराच मोठा बदल झाला.

सीपायथॉन हे C भाषेत लिहीलेले पायथॉन सॉफ्टवेर फाऊंडेशनचे पायथॉनसाठीचे अनुवादक आहे.

इतिहास

संपादन

पायथॉन १९८० च्या उत्तरार्धास उगमास आली आणि १९८९ दरम्यान तिचा वापर सुरू झाला. गीडो वान रॉसम हे पायथॉनचे जनक आहेत.अपवाद हाताळणे आणि अमोएबा संगणक कार्यप्रणालीशी संलग्न असणे ही या भाषेची मुख्य वैशिष्ठ्ये आहेत.

पायथॉन २.० ही १६ ऑक्टोबर २०००ला प्रदर्शित झाली. चक्रीयरित्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे आणि युनिकोड आधार ही त्यामधील मुख्य वैशिष्ठ्ये आहेत.

पायथॉन ३.० ही ३ डिसेंबर २००८ला प्रदीर्घ चाचणीनंतर प्रदर्शित झाली. पायथॉन २ व पायथॉन ३ यांमध्ये लिहीलेल्या आज्ञावल्या एकमेकांशी विसंगत आहेत. मात्र, पायथॉन ३मध्ये पायथॉन २ च्या आज्ञावल्यांचे पायथॉन ३मध्ये रूपांतर करण्याची क्षमता आहे.

मांडणी व शब्दार्थशास्त्र.

संपादन

पायथॉन ही वाचायला सोपी आज्ञावली भाषा आहे.इतर आज्ञावली भाषांप्रमाणे महिरपी कंसाचा वापर पायथॉनमध्ये होत नाही. आज्ञावलीच्याअंती अर्धविरामाचा (;) वापर हा पर्यायी असतो.

समासाचा वापर
संपादन

समासाचा वापर आज्ञावलीखंड दर्शवितो.समासाचा चढता वापर आज्ञावलीखंडाचा पूर्वार्ध आणि उतरता वापर उत्तरार्ध दर्शवितो.

व्याकरण

  • "="(बरोबर चिन्ह):इतर आज्ञावली भाषांच्या तुलनेत "="चा वापर हा वेगळे अर्थ दर्शवितो. उ.दा: C भाषेमध्ये, " x = 2 " या आज्ञावलीचा अर्थ असा होतो कि उजव्या बाजूला असलेली किंमत डाव्याबाजूच्या अनित्य संख्येमध्ये नक्कल करा. पण C मध्ये अनित्य संख्या व किंमत ही एका जातीचे असणे आवश्यक आहे.हा नियम पायथॉन मध्ये पाळणे आवश्यक नसते.

शिष्ट्ये

संपादन
  • पायथॉन ही एक बहुभिमुख आज्ञावली भाषा आहे. म्हणजे ती वस्तुभिमुख[], कार्यनिष्ठ,रचनात्मक अशा कोणत्याही प्रकारे वापरता येते.
  • या भाषेचा विकास करताना ती अधिकाधिक नैसर्गिक वाटेल यादृष्टीने व्याकरण बनवले आहे.
  • तसेच, आज्ञावली अधिकाधिक वाचनीय होईल यादृष्टीने भाषेचे व्याकरण बनवले आहे. उदा., यात आज्ञावलीखंड गुंफताना कंस वापरण्याऐवजी समास सोडला जातो.
  • ही एक विवृत भाषा आहे.[]
  • डायनॅमिक चलप्रकार व्यवस्था वापरली जाते.[]
  • स्मृती स्वव्यवस्थापन असते.
  • यात युनिकोड चलनामे वापरता येतात.[] (खालील उदाहरण पहावे.)
  • पायथॉन मुक्त स्रोत आहे.[]

उदाहरण

संपादन
उत्तर = input("पायथॉन सोपी आहे का? ")
if उत्तर == "हो":
	print("छान")
a=b=c=1
a,b,c = 1,2,"john"

संदर्भ

संपादन
  1. ^ a b c d कार्यकारी सारांश
  2. ^ डिफॉल्ट एनकोडींग यूटीएफ-८
  3. ^ पायथॉनचा मुक्तस्रोत परवाना

बाह्य दुवे

संपादन
  1. पायथॉनचे अधिकृत संकेतस्थळ
  2. पायथॉनचे अधिकृत दस्तावेजीकरण