पायचीत
क्रिकेटचा नियम
पायचीत होणे हा क्रिकेटच्या खेळातील फलंदाज बाद होण्याचा प्रकार आहे.
फलंदाज पायचीत ठरण्यासाठी पंच खालील नियम वापरतात.
१. चेंडूचा टप्पा लेग-स्टम्पच्या बाहेर पडला होता का?
हो - फलंदाज नाबाद.
नाही - पुढील नियम पहा.
२. चेंडूचा आघात आधी पायाला झाला की बॅटला?
बॅट - फलंदाज नाबाद.
पाय - पुढील नियम पहा.
३. चेंडूचा आघात फलंदाज व गोलंदाजाकडील यष्टींच्या मध्ये झाला?
नाही (ऑफ स्टम्पच्या बाहेर).
- फलंदाजाने आपल्या बॅटने चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता?
- हो - फलंदाज नाबाद.
- नाही - नियम ४ पहा.
हो - नियम ४ पहा.
४. पंचाच्या मते जर पायाला न लागता चेंडू पुढे गेला असता तर तो यष्टीला लागला असता?
हो - फलंदाज बाद. नाही - फलंदाज नाबाद.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |