पां.न. राजभोज
भारतीय राजकारणी
(पां.ना. राजभोज या पानावरून पुनर्निर्देशित)
पांडुरंग नथुजी राजभोज उर्फ बापूसाहेब राजभोज (१५ मार्च १९०५ - २ जुलै १९८४) हे एक भारतीय राजकारणी होते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी होते. त्यांनी १९५७-६२ दरम्यान राज्यसभेमध्ये बॉम्बे स्टेटचे प्रतिनिधित्व केले.[१]
१९४२ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनचे ते सरचिटणीस होते.[२]
महाराष्ट्र विधान परिषदेत आमदार असताना पा.ना. राजभोज यांनी मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर करावे, आणि त्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी लावून धरली होती.[३]
त्यांनी मराठीमध्ये लष्करी पेशा हे पुस्तक लिहिले. १९८४ मध्ये त्यांचे निधन झाले आणि त्यांना दोन मुलगे व दोन मुलगी होती.[१]
संदर्भ
संपादन- ^ a b "RAJYA SABHA MEMBERS BIOGRAPHICAL SKETCHES 1952 - 2003" (pdf). Rajya Sabha Secretariat, New Delhi. p. 3. 15 November 2017 रोजी पाहिले.
- ^ "Dr. Ambedkar and All India Scheduled Castes Federation". 2017-11-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 15 November 2017 रोजी पाहिले.
- ^ "BBC News मराठी".