पांढऱ्या भुवईची भू कस्तुरिका
पांढऱ्या भुवईची भू कस्तुरिका (इंग्लिश:whitebrowed ground thrush) हा एक पक्षी आहे.
ओळख
संपादनहा पक्षी मध्यम आकाराच्या मैनेएवढा असतो.नर हा पांढरी भुवई असलेला काळसर पक्षी आहे.ह्या पक्षाचा मध्य भागाचा रंग राखीव किंवा पांढरा असतो.नरापेक्षा मादीचा रंग वेगळा असतो.पिवळट भुवई.पंखाखाली रुंद पांढऱ्या पट्ट्या असतात.
वितरण
संपादनहे पक्षी मणिपूर येथे दाट झाडी असलेल्या डोंगराच्या रांगा येथे असतात तसेच सैबेरियातील येनिसे ते अमुरलॅंंड येथे मोठ्या प्रमाणावर आढळून येतात.
निवासस्थाने
संपादनहे पक्षी सदाहरितपर्णी वृक्षाची जंगले येथे निवास करतात.
संदर्भ
संपादन- पक्षिकोश - मारुती चितमपल्ली