पहिला मुराद
पहिला मुराद (१३२६ – १५ जून १३८९; तुर्की: I. Murat Hüdavendigâr) हा ओऱ्हानचा मुलगा व इ.स. १३६२ ते १३८९ दरम्यान ओस्मानी साम्राज्याचा सुलतान होता. आपल्या कारकिर्दीत त्याने एदिर्ने येथे राजधानी वसवून ओस्मानी साम्राज्याचा सामाजिक विकास केला तसेच बाल्कनमधील मोठा भूभाग आपल्या अंमलाखाली आणला.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत