पश्मी
पश्मी ही भारतातील कुत्र्याची एक जात आहे. हिला मुधोळ हाऊंड किवा कॅराव्हान हाऊंड असेही म्हणतात. कुत्र्याची ही जात मुख्यतः कर्नाटक, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये आढळते. पूर्वी या कुत्र्याचा उपयोग शिकाऱ्याच्या मदतीसाठी होत असे. आता हा घर राखण्यासाठी पाळला जातो.
वैशिष्ट्ये
संपादनहे श्वान सामान्य कुत्र्यापेक्षा उंच असते, ह्याचे तोंड लांबट असते. शेपटीवर व कानांवर जास्त केस असतात. ही कुत्री आक्रमक असतात. ही श्वाने बहुधा पांढऱ्या,करड्या किंवा काळ्या रंगाची असतात. यांचा आवाज इतर कुत्र्यांपेक्षा मोठा असतो. यांना अनोळखी माणसांनी स्पर्श केलेला फारसा आवडत नाही.ह्या कुत्र्यांना एकटे राहायला आवडते. म्हणजेच कळपात लोकांनं मध्ये राहायला आवडत नाही.