कुटुंबनियोजन

मुले कधी असणार यासंबंधीचे नियोजन आणि अशा योजना अंमलात आणण्यासाठी जन्म नियंत्रण व इतर तंत्राचा व
(परिवारनियोजन या पानावरून पुनर्निर्देशित)

कुटुंबनियोजन म्हणजे कुटुंब केव्हा वाढवायचे या बद्दलचे संतती नियमनाद्वारे नियोजन होय. यात मुलांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणे आणि त्यांच्या जन्माच्या दरम्यान अंतराळ, विशेषतः गर्भनिरोधक किंवा स्वयंसेवी नसबंदीद्वारे नियंत्रित करणे यांचा समावेश होतो.

भारतातील कुटुंबनियोजन कार्यक्रमाचे चिन्ह
पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया

कुटुंब नियोजनाची व्याप्ती

संपादन

कुटुंब नियोजन म्हणजे केवळ जन्माला येणाऱ्या बालकांच्या संख्येचे नियंत्रण नव्हे तर त्यात इतरही अनेक गोष्टींचा समावेश होतो. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ञ समितीने १९७० सालच्या अहवालात[] पुढील गोष्टींचा समावेश कुटुंब नियोजनात होतो, असे म्हणले आहे.[]

  1. जन्मांचे नियंत्रण आणि जन्मांमध्ये योग्य अंतर
  2. वंध्यत्वावर सल्ला
  3. पालकत्वाचे शिक्षण
  4. लैंगिक शिक्षण
  5. पुनरुत्पादन संस्थेशी संबंधित रोगांसाठी छाननी (उदा. सर्व्हायकल कॅन्सर)
  6. जनुकीय समुपदेशन
  7. विवाहपूर्व सल्ला आणि तपासणी
  8. गर्भधारणा चाचणी करणे
  9. विवाहपूर्व समुपदेशन
  10. पहिल्या अपत्य जन्मासाठी पालकांची तयारी करून घेणे
  11. अविवाहित मातांना आरोग्यसेवा पुरवणे
  12. घराचे अर्थशास्त्र आणि पोषण याबद्दलचे शिक्षण देणे
  13. दत्तक सेवा पुरवणे

ही कामे प्रत्येक देशाची कुटुंब नियोजनाची उद्दिष्टे आणि धोरणे यानुसार बदलतात. कुटुंब नियोजनाची आधुनिक व्याख्या ही आहे.

कुटुंब नियोजन आणि महिलांचे आरोग्य

संपादन

कुटुंब नियोजनाचा महिलांच्या आरोग्याशी जवळचा संबंध आहे. विकसनशील देशांमध्ये बाळंतपणाच्या वेळी महिलांचे मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. महिलेचे वय जसे वाढत जाते तसा आणि ३-४ मुले झाल्यावर हा धोका जास्त वाढतो. कुटुंब नियोजनाद्वारे स्त्रीच्या पुनरुत्पादन चक्रात हस्तक्षेप केल्यावर स्त्रियांना मुलांच्या संख्येवर नियंत्रण ठेवता येते, दोन मुलांमध्ये योग्य अंतर ठेवता येते आणि त्यामुळे बाळंतपणातील मृत्यू,अनारोग्यता कमी होते आणि महिलांचे आरोग्य सुधारते.केवळ कुटुंब नियोजनाची योग्य साधने उपलब्ध झाली तर माता मृत्यूंचे प्रमाण २५ टक्क्यांनी कमी होते आणि बालकांच्या मृत्यूचे प्रमाण 20 टक्क्यांनी कमी होते. []

भारतातील कुटुंब नियोजन कार्यक्रम

संपादन

या कार्यक्रमाचे पूर्वीचे नाव 'कुटुंबनियोजन' असे होते.देशात या कार्यक्रमाची सुरुवात इ.स. १९५२ साली तर तत्कालीन मुंबई प्रांतात इ.स. १९५७ साली झाली.कुटुंब नियोजनाबद्दल अनेक गैरसमज आहेत.लोकांच्या मनात कुटुंब नियोजनाचा संबंध नसबंदीशी आहे तसेच जन्म नियंत्रणाशी आहे.या संकल्पनेत कुटुंब कल्याणाचा समावेश कार्यक्रम सुरू झाल्यापासून 15 वर्षांनी झाला आणि त्याचे नाव इ.स. १९७८ साली 'कुटुंबकल्याण कार्यक्रम' असे झाले.इ.स.१९७० मध्ये या कार्यक्रमाचे घोषवाक्य "दों या तीन बस्स" असे होते.इ.स. १९७१ सालापासून आजपर्यंत यात अनेक घटकांची भर पडून इ.स. १९९७ सालापासून हा कार्यक्रम प्रजनन आणि बालसंगोपन या नावाने ओळखला जातो.१९८० नंतर दोनच मुले असण्यावर भर देण्यात आला आणि त्यामुळे "हम दो, हमारे दो" हे या कार्यक्रमाचे हिंदी भाषेतील घोषवाक्य होते.भारतातील कुटुंब नियोजन कार्यक्रमाचे उद्दिष्ट 'छोटे कुटुंब मानक' तयार करणे असे आहे.सध्या 'मुलगा किंवा मुली- दोनच अपत्ये बास' ,'3 वर्षांनंतर दुसरे मूल' आणि 'सार्वत्रिक लसीकरण' या तीन मुद्द्यांवर भर देण्यात येत आहे. कुटुंब नियोजन कार्यक्रमामुळे भारतातील जननदर १९५० मधील ६.४ वरून २०१२ मध्ये २.४ वर आला.

संतती नियमन

संपादन
 
Birthday greetings from five lactated food babies Wellcome L0034389

संतती नियमनाचे विविध प्रकार आहेत. ते मुख्यतः दोन प्रकारात विभागले जातात.

गर्भधारणा टाळण्यासाठी ज्या जोडप्यांना कोणत्याही किंमतीत बंदी घालायची असेल त्यांच्यासाठी निरोध सारख्या दुसऱ्या प्रकारचे जन्म नियंत्रण असलेल्या नैसर्गिक कौटुंबिक नियोजनाचे मिश्रण करणे आवश्यक आहे. नैसर्गिक कौटुंबिक नियोजनांचे मुख्य फायदे म्हणजे त्यात रसायने किंवा संप्रेरकांचा समावेश नाही आणि यामुळे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.

वयस्कर आणि वंशांकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रौढांकडे कौटुंबिक नियोजन पर्यायांबद्दल जागरुक असले पाहिजे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, एकासाठी, कौटुंबिक नियोजन केवळ गर्भधारणा प्रतिबंधक पद्धती म्हणून मर्यादित नाही. त्यानुसार, नियोजित गर्भधारणा आणि प्रत्येक नवजात नवजात मुलाची इच्छा आहे याची खात्री करणे हे आहे.

कुटुंब नियोजनाचे तोटे : त्याच्या जन्म नियंत्रण गुणधर्मांशिवाय, गोळी देखील आरोग्य फायदे आहेत. प्रोजेस्टिन-केवळ आणि संयोजनाच्या गोळ्या कमी होतात, मासिक पाळीच्या तीव्रतेची तीव्रता कमी करते आणि एक्टोपिक गर्भधारणेची शक्यता कमी करते.


  1. ^ Services, WHO Expert Committee on Family Planning in Health; Organization, World Health (1971). "Family planning in health services : report of a WHO expert committee [meeting held in Geneva from 24 to 30 November 1970]" (अरबी भाषेत). Cite journal requires |journal= (सहाय्य)
  2. ^ Park, K. Park's text book of preventive and social medicine. Bhanot. p. 497.
  3. ^ Park, K. Park's text book of preventive and social medicine. Bhanot. p. 498.