परिमेय संख्या
परिमेय संख्या [१] (इंग्लिश: Rational number, रॅशनल नंबर) म्हणजे एखादा पूर्णांक अ आणि एखादा शून्येतर पूर्णांक ब यांच्यातल्या अ/ब अशा गुणोत्तराच्या स्वरूपात लिहिल्या जाणाऱ्या संख्यांना उद्देशून वापरली जाणारी संज्ञा होय. परिमेय संख्यांच्या या गुणोत्तर स्वरूपातील विशेष बाब ही, की त्याच्या छेदातील ब हा पूर्णांक कदापि शून्य नसतो. अर्थात ब पूर्णांकाचे मूल्य १ असू शकते; म्हणूनच प्रत्येक पूर्ण संख्या ही परिमेय संख्यादेखील असते. शून्यास कोणत्याही पूर्ण संख्येने भागले असता उत्तर शून्यच येते; त्यामुळे शून्यासही परिमेय संख्यांत गणले जाते.
परिमेय संख्यांचा संच[श १] ठळक टायपातल्या Q या रोमन वर्णाक्षराने (किंवा ब्लॅकबोर्ड ठळक टायपातल्या , युनिकोड U+211A ℚ), दर्शवतात. लॅटिन भाषेतल्या "कोशंट" (लॅटिन: Quotient) या शब्दातील "क्यू" या वर्णाक्षरावरून हे चिन्ह आले आहे.
या संख्या भौमितिक प्रतलावर अचूक मांडता येतात.
पारिभाषिक शब्द
संपादनसंदर्भ व नोंदी
संपादन- ^ गणितशास्त्र परिभाषा कोश. p. २०५.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |