पद्मजा फाटक
पद्मजा शशिकांत फाटक (जन्म : १४ नोव्हेंबर १९४२; - ६ डिसेंबर २०१४) या एक मराठी लेखिका होत्या. त्या मराठीच्या एम.ए. होत्या. इ.स. १९६४ सालापासून फाटक स्त्री आणि वाङ्मयशोभा, इत्यादी नियतकालिकांमधून लेखन करीत. त्यांची पंधराहून अधिक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.
फाटक यांचा दूरदर्शनवरील सुंदर माझं घर आणि शरदाचं चांदणं’ या कार्यक्रमांत सहभाग होता. त्या कार्यक्रमांत त्या निवेदिका असत.
मुक्तपणा पूर्णपणे न उधळलेली लेखिका अशा शब्दांत नंदा खरे यांनी पद्मजा फाटक यांचे वैशिष्ट्य सांगितले होते. स्त्री मासिकासाठी पुरुषांच्या फॅशन्स या विषयावर एकदा त्यांनी लिहिले होते.
जीवन
संपादनपद्मजा फाटक यांच्या पतीचे नाव शशिकांत, मोठ्या मुलीचे सोनिया आणि मुलाचे नाव श्रेयस. त्यांना आणखी एक मुलगी आहे. शर्वरी.
साहित्यातील योगदान
संपादनहसरी किडनी या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर त्यांनी कंसात मजेत हे स्वतःचे टोपणनाव दिले आहे.
पुस्तके
संपादन- आवजो (प्रवासवर्णन)
- गर्भश्रीमंतीचे झाड
- चमंगख चष्टीगो (बालसाहित्य)
- चिमुकली चांदणी (बालसाहित्य)
- दिवेलागणी
- पैशाचे झाड
- बापलेकी (संपादित आत्मकथने, अन्य संपादिका - दीपा गोवारीकर आणि विद्या विद्वांस)
- बाराला दहा कमी (विज्ञानकथा, सहलेखक - माधव नेरूरकर) : या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा १९९६-९७चा पुरस्कार मिळाला आहे.
- माणूस माझी जात
- रत्नांचे झाड (अप्रकाशित)
- राही
- शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक
- सोनेलुमियरे
- सोव्हेनियर (अमेरिकन जीवनावरील लेख)
- हॅपी नेटवर्क टु यू (अमेरिकन जीवनावरील लेख)
- हरविलेली दुनिया
- हसरी किडनी अर्थात "अठरा अक्षौहिणी” (आत्मकथन)
- हिंद विजय सोसायटीचे पगडी आजोबा
पुरस्कार
संपादन- महाराष्ट्र शासनाचे ५ पुरस्कार, इतर अनेक पारितोषिके, शिष्यवृत्ती, सन्मान, मानद नेमणुका इत्यादी