पंढरपुरी म्हैस ही एक भारतीय म्हशीची जात आहे. या जातीच्या म्हशी सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव येथे आढळतात. या म्हशी आकाराने मध्यम, पण अतिशय काटक असतात. लांब व निमुळता चेहरा, खांद्यापर्यंत पोचणारी लांब व पिळवटलेली शिंगे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. या म्हशींचे वजन साधारण ४०० किलो व रेड्यांचे वजन ५०० किलो असते. पारड्या वयाच्या २५ ते ३० महिन्यांत गाभण राहतात आणि ३५ ते ४० महिन्यांत पहिल्यांदा वितात.

मध्यम शरीर, लवकर वयात येणाऱ्या पारड्या, कमी भाकडकाळ, पहिल्या वेताचे कमी वय, उत्तम प्रजोत्पादन व दुग्धोत्पादन क्षमता आणि दुग्धोत्पादनाचे सातत्य या गुणांमुळे दुधासाठी ही जात ओळखली जाते. या म्हशी एका वेतात १५०० ते १८०० लिटर दूध देतात.

हे देखील पहा संपादन

संदर्भ संपादन

बाह्य दुवा संपादन