उल्हास बापट

(पंडित उल्हास बापट या पानावरून पुनर्निर्देशित)

पंडित उल्हास यशवंत बापट (जन्म : ३१ ऑगस्ट १९५०; - मुंबई, ४ जानेवारी २०१८) हे एक मराठी संतूरवादक होते. त्यांचे वडील पोलीस उपायुक्त यशवंत गणेश बापट, हे एक उत्तम गायक होते. पाच वर्षाच्या वयाच्या आपल्या मुलाचा संगीताकडे असलेला कल त्यांच्या लक्षात आला आणि उल्हास बापट यांना पंडित रमाकांत म्हापसेकर यांच्याकडे तबल्याच्या शिकवणीसाठी पाठविले गेले. या बालवयातील संगीतशिक्षणामुळे उल्हास बापट यांना तालाचे उत्तम ज्ञान झाले, आणि ते पुढील आयुष्यात सातत्याने उपयोगी पडले.

पुरसे तबलाशिक्षण झाल्यावर उल्हास बापट आपल्या वडिलांकडे कंठसंगीत शिकले. त्याच काळात ते प्रसिद्ध सरोद वादक श्रीमती झरीन दारूवाला यांच्या संपर्कात आले. झरीन दारूवाला यांच्यानंतर त्यांनी के.जी. गिंडे आणि वामनराव सडोलीकर यांना गुरू केले आणि त्यांच्याकडे असलेल्या रागशास्त्र, बंदिशी आणि खयाल गायन यांच्या माहितीच्या अफाट साठ्यातले थोडेफार हस्तगत केले. दोन घराण्यांच्या गायकीचा केलेल्या अभ्यासातून त्यांना संगीतातील सौंदर्याचा साक्षात्कार झाला. इतक्या विविध अनुभवांनंतर उल्हास बापट यांना, आपल्याला संतूर या वाद्यात रस असल्याचा शोध लागला, आणि त्यांनी संतूरवादनात प्रावीण्य मिळविण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू केले.

१९७५मध्ये पंडित रविशंकर यांनी मुंबईत स्थापन केलेल्या ’संचरिणी’तील खासगी बैठकीत उल्हास बापट यांनी आपले वादन श्रोत्यांपुढे पहिल्यांदा सादर केले.

आज उल्हास बापट हे जगातल्या उत्कृष्ट संतूर वादकांपैकी एक होते. संतूरच्या तारा जुळविण्यासाठी ’क्रोमॅटिक सिस्टिम’(फिक्स्ड ट्यूनिंग) अचल थाट पद्धती वापरणारे ते तत्कालीन एकमेव वादक होते. भारतात नाही तर जगातील अनेक देशांत उल्हास बापट यांच्या संतूरवादनाची कीर्ती पसरली..त्यासाठी बापट यांनी १९८८पासून कॅनडा, अमेरिका आणि इंग्लंड या देशांचे दौरे केले. पंडित नारायण मणी यांच्याबरोबर उल्हास बापट यांच्या ध्वनिमुद्रित संतूरवादनाचे ’इन कस्टडी’ आणि ’कॉन्व्हरसेशन्स’ या नावांचे दोन आल्बम प्रकाशित झाले आहेत.

पंडित उल्हास बापट यांचे भारतातील अनेक संगीतसमारोहांत कार्यक्रम झाले आहेत. मराठी आणि हिंदी चित्रपटांतील अनेक गीतांत आणि पार्श्वसंगीतात उल्हास बापट यांचे संतूर वाजते. संगीत दिग्दर्शक शारदापासून आत्तापर्यंतच्या बहुतेक संगीत दिग्दर्शकांनी बापटांच्या संतूरचा उपयोग करून घेतला आहे.

’घर’पासूने ते ’१९४२ ए लव्ह स्टोरी’ आणि ’जैत रे जैत’, या चित्रपटांत आणि आशा भोसले यांच्या ’ऋतु हिरवा’ या आल्बममध्येदेखील उल्हास बापट यांच्या संतूर वादनाचा वापर झाला आहे.

संतूर

संपादन

संतूर हे मुळात लोकसंगीतात उपयोगी पडणारे एक वाद्य. त्याला शंभर तारा असतात. त्याच्यावर संशोधन करून शिवकुमार शर्मा यांनी आणि त्यांनंतर काही वादकांनी त्या वाद्याला शास्त्रीय संगीतासाठी सज्ज केले. संतूरवर मिंड (स्वरसातत्य) घेण्याचीची किमया बापट यांनी विकसित केली आणि अविरत संशोधनामधून क्रोमॅटिक संतूरचा जन्म झाला. हरहुन्नरी संगीतकार राहुल देव बर्मन यांच्याकडे उल्हास बापट यांनी फिल्मसंगीताची कारकीर्द १९७८पासून ‘घर’ या चित्रपटाने सुरू केली, ती ’१९४२ – अ लव्ह स्टोर” या चित्रपटापाशी थांबली. आर.डी. बर्मन यांचा उल्हास बापट यांच्यावर खास जीव होता. ते दोघे चांगले मित्र होते. ४ जानेवारी ही राहुल देव बर्मन यांची पंचमदांची पुण्यतिथी. याच दिवशी त्यांचे निस्सीम चाहते असलेल्या उल्हास बापट कालवश झाले.

रागनिर्मिती

संपादन

पंडित उल्हास बापट यांनी शास्त्रीय संगीतातील काही नवीन रागांना जन्म दिला. ते राग असे : - परिजात (प्रभात समय), गोरख कंस (रात्रीचा प्रहर), अमृत रांजणी (रात्रीचा प्रहर), अभोगिनी (रात्रीचा प्रहर), चारुवी (प्रभात समय), पूर्ण नाद (समयाचे बंधन नाही), सावली, दिमिनिषा, वगैरे.

तालनिर्मिती

संपादन

मकरंद (११ मात्रा), प्रतीक (९ मात्रा).

संगीत दिग्दर्शन

संपादन
  • बाहुलीचं लगीन, चुलीवरची खीर आदी बालगीतांचा इरेको नावाचा आल्बम
  • भक्तिमाला
  • माणिक प्रभू भजनमाला
  • क्रिसेन्डो


  • ’सहज स्वरांतून मनातलं’ नावाचे आत्मचरित्र.


पहा : बापट


(अपूर्ण)