पंचचुली ही हिमालय पर्वतातील कुमाऊच्या पूर्वेकडे स्थित पर्वत रांग आहे. ही भारतातील उत्तराखंड राज्यात आहे. यात पाच शिखरे असून सगळ्यात उंच शिखराची उंची ६,३३४ मिटर आहे. पांडवांच्या पाच चुली अशा नावाने ही शिखरे ओळखली जातात.
हिमालयात ज्या ठिकाणी गिरीभ्रमणास जातात त्यापैकी हे एक ठिकाण आहे.