न्यायालयीन सक्रियता

सामान्यत: न्यायालयात येणारे खटले हे बाधित व्यक्तींनी स्वतः केलेल्या तक्रारीच्या किंवा याचिकेच्या रूपात दाखल होतात. परंतु गेल्या काही दशकांत परिस्थिती बदलली आहे. भारतीय न्यायमंडलाने त्यांच्या कार्याची व्याप्ती वाढवली आहे. उदा, सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयात कोणत्याही व्यक्तीला याचिका दाखल करण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्या विषयाशी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष निगडित असलेली व्यक्ती ही याचिका दाखल करू शकते.

अश्या यचिकांना ' जनहित याचिका ' म्हणतात. काही वेळा न्यायालयाने कोणतीही तक्रार अथवा याचिका दाखल नसताना स्वतः सार्वजनिक विषयाची दखल घेत दावा दाखल केला आहे. न्यायालयाने घेतलेल्या पुढाकाराला "न्यायालयीन सक्रियता" असे म्हणतात.