नेपाळी गरुड

पक्षी प्रजाती

नेपाळी गरुड(शास्त्रीय नाव: Aquila nipalensis, ॲक़्विला निपॅलेन्सीस ; इंग्रजी: Steppe Eagle, स्टेपी इगल) हा गृध्राद्य कुळातील एक गरुड आहे. अग्न्येय युरोप, दक्षिण रशिया, ईशान्य चीन, पूर्व मंगोलिया येथे वीण. हिवाळ्यात मध्यपूर्व भागात, पूर्व व दक्षिण आफ्रिकेत व दक्षिण आशियात स्थलांतर.[] भारतीय उपखंडात तो पाकिस्तान,नेपाळ व उत्तर भारतात येतो. दक्षिणेकडे मुंबई व पूर्वेकडे ओडिशा येथपर्यंत. वायव्य भारत आणि हिमालयात वीण.[]

नेपाळी गरुड

प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: पक्षी
वर्ग: ॲक्सिपिट्रीफोर्मेस
कुळ: गृध्राद्य
(Accipitridae, एक्सिपिट्रीडी)

जातकुळी: ॲक़्विला
जीव: अ‍ॅ. निपॅलेन्सीस
शास्त्रीय नाव
ॲक़्विला निपॅलेन्सीस
(ब्रायन हॉजसन, १८३३)

ॲक़्विला निपॅलेन्सीस
इतर नावे

ॲक़्विला रॅपॅक्स निपॅलेन्सीस

Aquila nipalensis

वर्णन

संपादन

आकाराने घारीपेक्षा व पिंगट गरुडापेक्षा मोठा.आकार ७२ ते ८१ सेमी. गर्द उदी वर्ण,माथा आणि मान तपकिरी.पंखांखाली फिक्कट वर्णाचे पट्टे. चोच डोळ्यापर्यंत.

सांस्कृतिक

संपादन

नेपाळी गरुड हा इजिप्तचा राष्ट्रीय पशु आहे.

संदर्भ व नोंदी

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
  1. ^ "संग्रहित प्रत". 2017-04-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-12-28 रोजी पाहिले.
  2. ^ चितमपल्ली,मारुती. पक्षिकोश.