नेपाळचा प्रवास (पुस्तक)

नेपाळचा प्रवास हे संपतराव गायकवाड यांनी लिहिलेले पुस्तक आहे.

बडोद्याच्या गायकवाड संस्थानिकांच्या कुटुंबातील सदस्य असलेले संपतराव गायकवाड १९२५ साली नेपाळला गेले होते. त्यावर आधारित त्यांनी एक व्याख्यान बडोदे येथील सहचारिणी सभेमध्ये दिले. त्यांनी ते व्याख्यान पुस्तिकारूपाने प्रसिद्ध झाले व काही दिवसांनी इतर काही पुस्तकांच्या साहाय्याने त्यात अधिक माहिती घालून हे पुस्तक इ.स. १९२८मध्ये ते प्रकाशित झाले.

या पुस्तकात १६ प्रकरणे आहेत. नेपाळचे भौगोलिक स्थान, नेपाळचा इतिहास, नेपाळमधील धर्म, हिंदू लोक, भाषा, खाद्यपेये, सण व उत्सव, विवाहपद्धती, शासनपद्धती, पोशाख आदी सामाजिक परिस्थितीचे बरेच तपशील त्यात आहेत. उत्तरार्धात भागात नेपाळचा प्रवासमार्ग, प्रमुख शहरे, प्रेक्षणीय स्थळे, अर्वाचीन नेपाळ, माझा नेपाळमधील अनुभव आणि सर्वात शेवटी नेपाळच्या राजांची वंशावळ यांबद्दलची माहिती आहे.

प्रवासवर्णनापेक्षा नेपाळवर लिहिलेले पुस्तक असे याचे स्वरूप आहे.