नेटवर्क इंजिनीअरिंग

निःसंदिग्धीकरण पाने
(नेटवर्क इंजिनिअरिंग या पानावरून पुनर्निर्देशित)

नेटवर्क इंजिनिअरिंग हे संगणक प्रणालीचे एक महान व विस्तृत जाळे आहे. यांच्या सहाय्याने माहितीची आपआपसात देवाणघेवाण करता येऊ शकते, यासाठी वेगवेगळ्या साधनाचा उपयोग होतो. माहितीची देवाणघेवाण करण्याची वेगवेगळी साधने एकमेकांना जोडल्यामुळे जे नेटवर्क तयार होते त्याद्वारे डेटाची ने-आण करणे, डेटा सुरक्षित ठेवणे व परस्परांशी संवाद साध सोपे जाते.अशा प्रकारे एका कंपनीचे मुख्य कार्यालय जगातील कुठल्याही ठिकाणी असलेल्या कचेरीशी संवाद साधू शकते. जगाच्या एका टोकावरील एखादा माणूस जगाच्या कोणत्याही भागात असलेल्या माणसाशी संपर्क करू शकतो.

माहितीची देवाणघेवाण करण्याची साधने संपादन

  • ट्विस्टेड पेर वायर - माहितीची ने-आण करण्यासाठी पूर्वीपासून वापरण्यात येणारी वायर. यात तांब्याच्या दोन तारांना पीळ दिलेला असतो. जगभर या प्रकारच्या वायर माहिती व ध्वनी (voice) या दोन्हीची ने-आण करण्यासाठी वापरल्या जातात. मात्र, माहिती ने-आण करण्याचा यांचा वेग कमी असतो व या वायर्स तुलनेने कमी सुरक्षित असतात.
  • फायबर ऑप्टिक केबल्स् - फायबर ऑप्टिक केबल्स् या प्रकारच्या वायर्स काचेपासून बनविलेल्या असतात. काचेच्या अतिशय पातळ नळ्यांभोवती एक सुरक्षा कवच दिलेले असते. यामध्ये लेझर किरणांचा वापर होत असल्याने डेटा वाहून नेण्याचा वेग खूपच जास्त आहे. नळ्या आकारमानाने कमी व वजनाने अत्यंत हलक्या असल्याने जास्तीत जास्त डेटा वेगाने वाहून नेला जातो. फायबर ऑप्टिक केबलमध्ये कुठेही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन उत्पन्न होत नसल्याने व त्यावर या रेडिएशनचा परिणाम होत नसल्याने अनेक वायर्सची एक मोठी केबल बनवता येते. यामुळे डेटा पाठवण्यात किंवा घेण्यात त्रुटी राहत नाहीत.
  • कोॲक्शियल केबल - कोॲक्शियल केबल यामद्धे तांब्याच्या किंवा ॲल्युमिनियमच्या तारांभोवती आवरण दिलेले असते. त्यामुळे या वायर्स, सुरक्षित असतात. आवरणामुळे डेटा वाहून नेताना जे सिग्नल्स् पाठवले जातात त्यात (interference & disturbances) अडथळे येत नाहीत. या वायर जमिनीखालून किंवा पाण्यातूनही टाकता येतात. अनेक वायर्सच्या एका गठ्ठ्याभोवतीही आवरण देता येते. यामद्धे माहिती वाहून नेण्याचा वेग अर्थातच जास्त असतो.
  • मायक्रोवेव्ह सिस्टीम्स् - यामध्ये कोणत्याही बाह्य साधनाचा उपयोग केलेला नसतो, तर High Frequency Radio wavesचा वापर केलेला असतो. या वेव्हज् हवेतून प्रवास करत असल्याने वायर्सची आवश्यकता नसते, वेल्ह एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पाठवण्यासाठी अरिना वापरले जातात. रेडिओ सिग्नल्सच्या रूपात डेटा एका रीले स्टेशनकडून दुस-या रीले स्टेशनकडे पाठवला जातो. हे ॲंटेना एखाद्या उंच ठिकाणी, डोंगरावर, उंच बिल्डींगवर बसवलेले असतात. कारण मायक्रोवेव्हज पृथ्वीच्या उंच सखल भागावरून कुठेही परावर्तित करता येत नाहीत, तसेच या वेव्हज् वाहुन नेताना डेटा पाठवण्याचे स्थान व डेटा एकत्रित करण्याचे स्थान यामध्ये कोणताही अडथळा चालत नाही. दूरध्वनी मद्धे मायक्रोवेव्हचा वापर केला जातो.
  • सॅटेलाईट - पृथ्वीभोवतालच्या अवकाशात स्थापित केलेले सॅटेलाईटस् हे मायक्रोवेव्ह रिले स्थानक म्हणून वापरले जातात. या उपग्रहांवर सौरशक्तीचे कार्य करणारे काही Receivers व Transmitters बसवलेले असतात. Receive पृथ्वीवरून पाठवला गेलेला सिग्नल पकडतात, anmplify करतात व पृथ्वीवरील Transmitters हा सिग्नल दुसन्या स्थानकाकडे पाठवतात, पृथ्वीवरून उपग्रहाकडे सिग्नल पाठविण्याच्या क्रियेला अपलिंकिंग असे म्हणतात. उपग्रहाकडून पृथ्वीकडे सिग्नल पाठविण्याच्या क्रियेला डाऊनलिंकिंग असे म्हणतात.