राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्र

(नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्‍स या पानावरून पुनर्निर्देशित)


राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्र (इंग्रजी: National Centre for Radio Astrophysics (NCRA) - नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्‍स (एनसीआरए)) पुणे विद्यापीठाच्या आवारातील आयुकाच्या शेजारील रेडिओ खगोलभौतिकीच्या क्षेत्रातील एक अग्रगण्य संशोधन संस्था आहे. ही संस्था टाटा मुलभूत संशोधन संस्थेचा (टिआयएफआर) एक भाग आहे. एनसीआरए मध्ये खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी यामधील अनेक विषयांवर संशोधन होते ज्यामध्ये सक्रिय दीर्घिका, आंतरतारकीय माध्यम, पल्सार, विश्वनिर्मितीशास्त्र आणि विषेशत: रेडिओ खगोलशास्त्र आणि रेडिओ उपकरणशास्त्र यांचा समावेश आहे. एनसीआरए ने जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी) या पुण्यापासून ८० किमी अंतरावरील खोडद येथे मीटर तरंगलांबीतील जगातील सर्वात मोठ्या रेडिओ दुर्बिणीची निर्मिती केली असून ती दुर्बीण ही संस्था चालवते. त्याचबरोबर एनसीआरए ऊटी रेडिओ टेलिस्कोप ही वृत्तचित्तीच्या आकाराची तामिळनाडू राज्यातील उदगमंडलम येथील रेडिओ दुर्बीण सुद्धा चालवते.[२]

राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्र
Director स्वर्ण घोश[१]
Campus शहरी
Affiliations टाटा मुलभूत संशोधन संस्था



इतिहास

संपादन

या केंद्राचे मूळ १९६० च्या दशकातील टिआयएफआर येथील रेडिओ खगोलशास्त्र गटामध्ये आहे, ज्याची स्थापना गोविंद स्वरूप यांच्या नेतृत्वाखाली झाली. या गटाने ऊटी रेडिओ टेलिस्कोपची निर्मिती केली. लवकरच १९८० च्या दशकात जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप या नव्या रेडिओ दुर्बिणीची महत्त्वाकांक्षी योजना प्रस्तावित करण्यात आली. ही दुर्बीण बनवण्यासाठी पुण्याची निवड करण्यात आल्याने या गटासाठी पुणे विद्यापीठाच्या आवारात नवीन केंद्र बनवण्यात आले. या काळात रेडिओ खगोलशात्र गटाचे राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्रामध्ये रूपांतर झाले.[३]

संशोधन

संपादन

एनसीआरए मधील संशोधन कमी वारंवारतेच्या रेडिओ खगोलशास्त्राभोवती केंद्रित आहे. यामध्ये अनेक क्षेत्रात संशोधन केले जाते, जसे सौरभौतिकी, पल्सार, सक्रिय दीर्घिकीय केंद्रक, आंतरतारकीय माध्यम, ताऱ्याच्या महास्फोटानंतरचे अवशेष, दीर्घिकेचे केंद्र, जवळील दीर्घिका, उच्च-ताम्रसृतीवरील दीर्घिका इत्यादी.[४]

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "स्वर्ण के घोश" (इंग्रजी भाषेत). 2016-03-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३ फेब्रुवारी, २०१६ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "एनसीआरए संकेतस्थळ" (इंग्रजी भाषेत).
  3. ^ "एनसीआरएचा संक्षिप्त इतिहास" (इंग्रजी भाषेत). 2014-09-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-02-27 रोजी पाहिले.
  4. ^ "एनसीआरए-टिआयएफआर येथील संशोधन" (इंग्रजी भाषेत).