नॅशनल आर्काइव्ह्ज अँड रेकॉर्ड्स ॲडमिनिस्ट्रेशन
नॅशनल आर्काइव्ह्ज ॲंड रेकॉर्ड्स ॲडमिनिस्ट्रेशन तथा नारा अमेरिकेच्या ऐतिहासिक कागदपत्रे व सनदींचा संग्रह व सांभाळ करणारी संस्था आहे. या संस्थेचे दुय्यम लक्ष्य ही कागदपत्रे सामान्य जनतेला सहजपणे उपलब्ध करून देणे हे आहे.
या कागदपत्रांत अमेरिकेच्या कॉंग्रेसने पारित केलेले कायदे, राष्ट्राध्यक्षांचे वटहुकुम व जाहीरनामे तसेच अमेरिकेच्या केंद्रीय सरकारने प्रकाशित केलेली परिपत्रके यांचाही समावेश होतो. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीसाठीच्या इलेक्टोरल कॉलेजचे अधिकृत निकाल ही संस्था कॉंग्रेसला पोचवते.
या संस्थेची मुख्य इमारत वॉशिंग्टन, डी.सी.मध्ये कॉन्स्टिट्युशन ॲव्हन्यूवर आहे. याशिवाय अमेरिकेतली प्रमुख शहरांतून हिच्या शाखा आहेत.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |