निसर्गाने दिला आनंदकंद

माधव गाडगीळ यांनी लिहिलेले “निसर्गाने दिला आनंदकंद” हे पुस्तक, दैनिक सकाळ या मराठी वृत्तपत्रात लिहिलेल्या ८८ लेखांचा संग्रह आहे. ह्या लेखांत जीवसृष्टी, उत्क्रांती, परिसराचा इतिहास, मानव व निसर्ग यांचे परस्पर संबंध, नैसर्गिक संसाधनाचे व्यवस्थापन, विकास आणि पर्यावरण यांच्यातील तथाकथित द्वंद्व असे नानाविध विषय हाताळले आहेत. लेखांमध्ये वारंवार मराठी कवितांतील अवतरणे वापरली आहेत. 'निसर्गाने दिला आनंदकंद' हे कवी वसंत बापट यांच्या 'निसर्गाने दिला आनंद, केवळ सौंदर्य, केवळ आनंद' या कवितेतील अवतरण आहे.

साचा:निसर्गाने दिला आनंदकंद
लेखक माधव गाडगीळ
भाषा मराठी
देश भारत भारत
साहित्य प्रकार लेखसंग्रह
प्रकाशन संस्था सकाळ प्रकाशन
प्रथमावृत्ती जानेवारी २०१९
विषय शास्त्रीय विषयावरील लेख
आय.एस.बी.एन. 9387408612

पार्श्वभूमी

संपादन

माधव गाडगीळ यांनी शालेय जीवनापासून मराठीमध्ये सृष्टिज्ञान मासिकात लेखन प्रकाशित करायला सुरुवात केली. आजवर त्यांनी वेगवेगळ्या शास्त्रीय विषयांवर लेख लिहिलेले आहेत.

दैनिक सकाळ मध्ये त्यांचा पहिला लेख १९७३ साली प्रकाशित केला गेला. त्यानंतर २००६ सालपर्यंत ते बेंगलुरूला कार्यरत होते व त्या काळात त्यांनी फारसे मराठी लेखन केले नव्हते. २००६ साली पुण्याला परत आल्यावर त्यांनी दैनिक सकाळमध्ये नियमित लेखनास सुरुवात केली. त्यापैकी ८८ लेखांचा हा संग्रह सकाळ प्रकाशनाने २०१९ साली प्रकाशित केला आहे.

साहित्य सामुग्री

संपादन

या पुस्तकात खालील लेख समाविष्ट केलेले आहेत:

  1. सह्याद्रीची देवराई
  2. शोध शाश्वत शेतीचा
  3. घरगुती पाहुणचार
  4. शेतावर वैविध्य बहरू दे
  5. दिल मांगे मोअर
  6. टॉक्सिक मेमो
  7. करू या कोकणाचा स्कान्डिनेव्हीया
  8. चराचरांच्या उडतील चिंधड्या राई राई एवढ्या
  9. खडबडीत जग, बेडौल विकास
  10. मारकुटा दादला नको ग बाई
  11. कशी ठूबकते चिनी मांजरी हिरव्या साडीत
  12. आज मौज लूटू ठकबाजीची
  13. ए नीन्यो तेरे मुठ्ठी मे क्या है
  14. कोठे केव्हा कशामुळे या कोसळती दरडी
  15. स्वच्छता, कुठली सच्ची? कुठली नाटकी?
  16. सारे धुंदीत पैशांच्या हल्लाबोलांच्या
  17. जंगल हटले माकड ताप उफाळला
  18. सुपर बघ पछाडी सर्वा नाही भेदभाव
  19. जीवसृष्टी निर्मिली ईश्वराने मांडली लिनेयसने
  20. केवळ आमचा सह्याकडा, बेडूक साप सरड्यांचा
  21. अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा
  22. किस झाड की पत्ती
  23. सर्वांच्या आसमंतात नांदावी सृष्टी संपदा
  24. आम्ही कोण म्हणून काय पुसता
  25. बकुल तरूची फुले वेचुनी
  26. वसुधैव कुटुंबकम
  27. संघर्ष आणि अन् शोषण? की सहकार आणि पोषण?
  28. गाणे गाऊनी मला
  29. फुले बाण मदनाचे
  30. भरवू बिनभिंतीची शाळा
  31. बहरू दे सर्जनशीलता आपणा सर्वांची
  32. आपला खेळकर गोतावळा
  33. रेणू शोधू या मोलाचे
  34. सारख्या ढुशा मारतो रे
  35. मानव्य साकारले सृष्टी जिज्ञासेतुनी
  36. बोधाचा ध्वज उंच धरा रे
  37. किती चतुर या मधुनर्तिका
  38. अफलातून समुद्रसृष्टी
  39. दिसे जे रवीला, न दिसते कवीला
  40. हाडी मासी खिळतय शिस
  41. कहाणी: देव पानाची देवी थानाची
  42. नासतो फुका समिंदराचा ठेवा
  43. कशास घाई इतकी बाई
  44. फुलपाखरांची भटकंती
  45. होते मनात हत्ती आमुच्या रानी वनी नांदावे
  46. कुणी डोंगळे काळे काळे, कुणी तांबड्या भुरक्या मुंग्या
  47. गंज प्रेतांचा सडे, या गिधाडांनो पुढे
  48. ढोलकी सुतार बडवीती
  49. ऋणानुबंध यशवंतीचा
  50. पाखडण: प्रेमाची आणि क्रौर्याची
  51. मृगनयना रसिक मोहिनी
  52. धोबिणीच्या पुच्छ लालित्याचे रहस्य
  53. हत्तींच्या स्त्रीराज्यात
  54. निघाली वाऱ्यावरची वरात
  55. सच्चे मासे लुच्चे मासे, फसवे मासे फोफावले
  56. हुसकेल उपऱ्यास आपुली प्रीत
  57. अशीही मॅरेथॉन शर्यत
  58. बाई बाई, मनमोराचा कसा पिसारा फुलला
  59. देवमाशांनाही हवाय स्पेक्ट्रम
  60. सोंसा, तुझी रे झोप जगावेगळी
  61. खरा तो एकची धर्म - निसर्गा प्रेम अर्पावे
  62. शांत वृत्तीने धरणी व्यापली मुंगीभगिन्यांनी
  63. ऋतू बरवा बेडूक सुरांचा
  64. कल्पतरू तरी वृक्ष नसे हा
  65. बोलणं ग मंजुळ मैनेचं
  66. चतुर उभारती पंख आपले गर्वाने वरती
  67. विंचुळांच्या विषधारी देशा
  68. तुझी माझी प्रीत जगावेगळी
  69. सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळकोकण
  70. फुलवू या अवकाशाच्या ओसाडीला
  71. जंगल बचाव, मानव बचाव
  72. तेव्हा कोठे गेला होता कुंतीसुता तुझा धर्म
  73. अन्नदात्री वनदेवी
  74. नका सांगू बया, की धरण फुटलया
  75. चाल सहकारी लोकराज्याची
  76. नवी संकल्पना - इको सेन्सिटिव्ह झोनची
  77. मत्स्य पुराण
  78. संशय झोटिंग महा, देऊ नका त्या ठाव जरा
  79. लळिंग आणि लामकानी
  80. स्वर्ग धरेला चुंबायाला, खाली लवला
  81. उत्तम वेव्हारे निसर्गा राखोनी
  82. आम्ही जंगलाचे राजे
  83. दारुण दुष्काळाचे पोटी, फळे विवेकाची गोमटी
  84. खोप्यामधी खोपा, सुगरणीचा
  85. एक खंदा विज्ञान शार्दूल
  86. अनन्यता नोबल विजेत्या एलिनॉरची
  87. सलीम अली हिम्मत पवार आणि तणमोर
  88. जीवन: एक सहकार यात्रा