निर्माल्य दान ही एक पर्यावरणपूरक सामाजिक चळवळ आहे.

नाशिक येथे नदीत सोडलेली फुले

हिंदू धर्मात सांगितलेल्या पूजा पद्धतीत देवतेला फुले आणि पत्री म्हणजे पाने अर्पण करून पूजा केली जाते. ही देवतेला अर्पण केलेली फुले आणि पाने दुसऱ्या दिवशी काढून घेतली जातात आणि त्याला निर्माल्य असे म्हणले जाते.[] या निर्माल्याची योग्य व्यवस्था लावण्याचे काम करण्यासाठी सामाजिक संस्था पुढे येत आहेत आणि त्यातून निर्माल्य दान ही संकल्पना राबविली जात आहे.[]

स्वरूप

संपादन

निर्माल्य हे विसर्जन करतेवेळी पाण्यात सोडले जाते किंवा झाडाच्या मुळाशी घातले जाते. असे निर्माल्य मोठ्या प्रमाणावर शहरातील नदीच्या पाण्यात सोडले गेल्याने नदी प्रदूषित होते आहे आणि पर्यावरणाला मोठा धोका उत्पन्न होत आहे, हे जाणून स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला आहे.[] अशा संस्था नागरिकांना आवाहन करतात आणि त्यांच्याकडील सर्व निर्माल्य गोळा करतात. नागरिक नदीकाठावर असे निर्माल्य आणून देतात.

असे निर्माल्य गोळा होण्यासाठी जागोजागी निर्माल्य कुंड किंवा निर्माल्य कलश यांची योजना करण्यात येते. असे निर्माल्य गोळा करणे, त्याचे जैविक आणि अजैविक अशा दोन स्तरांवर वर्गीकरण करणे आणि त्यापासून उत्तम प्रकारचे सेंद्रिय खत तयार करणे असे याचे स्वरूप आहे. हे कंपोस्ट खत नागरिकांना उपलब्ध करून दिले जाते. यासाठीची यंत्र सुविधाही घाटावर उपलब्ध करून देण्यात आलेली असते. "स्वच्छ" या नावाची संस्था असा उपक्रम विशेषत्वाने राबवीत आहे.[]

गणेशोत्सवाच्या काळात हे उपक्रम दहा दिवस विविध विसर्जन घाटांवर राबविला जातो.

प्रयत्न

संपादन

नागरिकांनी या उपक्रमाला प्रतिसाद द्यावा म्हणून समाजातील मान्यवर व्यक्ती आणि संस्था यांचे प्रतिनिधी उत्सवी काळात नदीकाठी उभे राहून जनजागृती करतात. नागरिकांना निर्माल्य दान उपक्रमाचे महत्त्व समजावून सांगतात. त्यासाठी प्रत्यक्ष संवाद साधणे, फलक तयार करणे आणि ते जागोजागी प्रदर्शित करणे असा प्रयत्न केला जातो.[] निर्माल्य दान उपक्रम अधिक यशस्वी होण्यासाठी काही संस्था या स्थानिक पातळीवर कामा करतात. विविध सहकारी सहनिवास क्षेत्रांत निर्माल्य कलश ठेवले जातात. तेथे निवासी नागरिक आपापल्या घरातील निर्माल्य या कलशात आणून टाकतात. त्यामुळे सहनिवास पातळीवर हा उपक्रम यशस्वी होताना दिसतो.[] केवळ सहनिवास क्षेत्र नव्हे तर मंदिरे, स्मशानभूमी, फुलबाजार अशा ठिकाणाहून सुद्धा निर्माल्य किंवा फुले गोळा केली जातात, हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणता येते.[]

पुरस्कार

संपादन

निर्माल्य दानाचा उपक्रम राबवून पर्यावरण रक्षणास हातभार लावीत असलेल्या स्वयंसेवी संस्थाच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.[]

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ Unmeshanand (1994). Śāstr ase sāṅgate. Vedavāṇī Prakāśana.
  2. ^ "https://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-response-nirmalya-donate-70657". ७. ९. २०१७. १९. १०. २०१९ रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); External link in |title= (सहाय्य)
  3. ^ "'निर्माल्य द्या, खत घ्या'". ६. ९. २०११. 2019-10-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १९. १०. २०१९ रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. ^ a b "विविध संस्थांतर्फे नदीघाटांवर निर्माल्य दानासाठी जनजागृती". ३. ९. २०१४. १९. १०. २०१९ रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  5. ^ a b c सय्यद, झियाउद्दीन (९. ९. २०१५). "निर्माल्य व्यवस्थापनाचा दुसरा टप्पा कार्यान्वित". १९. १०. २०१९ रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)