निरोदबरन
निरोदबरन चक्रवर्ती : (१७ नोव्हेंबर १९०३ – १७ जुलै २००६, पाँडिचेरी )
निरोदबरन, किंवा 'निरोददा' या नावाने ते ओळखले जात. ते श्रीअरविंद यांचे जवळचे शिष्य होते. तसेच श्रीअरविंद यांचे ते वैयक्तिक डॉक्टर आणि सचिव होते. आणि 'सावित्री' या महाकाव्याचे लेखनिक होते. ते श्रीअरबिंदो आश्रमातील ज्येष्ठ सदस्य होते.
जीवन
संपादननिरोदबरन यांनी एडिनबर्ग विद्यापीठातून वैद्यकशास्त्रात पदवी प्राप्त केली. पॅरिसमध्ये असताना दिलीप कुमार रॉय यांनी त्यांना श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्याबद्दल सांगितले होते. १९३० मध्ये, त्यांनी आश्रमाला भेट दिली आणि त्यांची श्रीमाताजी यांच्याशी भेट झाली आणि त्यांना आध्यात्मिक अनुभव प्राप्त झाला. पुढे म्हणजे इ.स. १९३३ मध्ये त्यांनी श्रीअरविंद आश्रमात प्रवेश घेतला. आश्रमात त्यांनी नवीन जीवनात प्रवेश केला आणि त्यांना अनेक आध्यात्मिक अनुभव आले. योगाभ्यास करण्याच्या उद्देशाने ते आश्रमात परतले आणि निवासी डॉक्टर म्हणून कामाला लागले.
आश्रमाच्या सार्वजनिक जीवनातून निवृत्त होऊन श्रीअरविंद एकांतवासात राहत होते तेव्हा ते साधकांशी पत्रांद्वारे संवाद साधत असत, साधनेसंबंधीच्या सूचना पत्रांद्वारे देत असत. १९३३ ते १९३८ या कालावधीत श्रीअरविंद यांच्याशी निरोदबरन यांनी पाच वर्षांचा विपुल पत्रव्यवहार केला, ज्याचे वर्णन पत्रव्यवहारात्मक इतिहास (एपिस्टोलरी हिस्ट्री) असे केले जाते. सुमारे १२०० पृष्ठांचे हे लेखन आहे. या पत्रांच्या द्वारे, श्रीअरविंद यांनी निरोदबरन यांच्या काव्यलेखनाच्या प्रयत्नांना प्रोत्साहन दिले आहे, मार्गदर्शन केले आहे.
नोव्हेंबर १९३८ मध्ये श्रीअरविंद पाय घसरून त्यांच्या खोलीत पडले आणि त्यांच्या उजव्या पायास फ्रॅक्चर झाले. तेव्हा निरोदबरन 'फिजिशियन' या नात्याने त्यांच्या सोबत उपस्थित राहू लागले. श्रीअरविंद यांनी समाधी घेईपर्यंत म्हणजे १९३८ ते १९५० या १२ वर्षांच्या कालावधीमध्ये निरोदबरन यांनी श्रीअरविंदांची सेवा केली.
ग्रंथसंपदा
संपादननिरोदबरन यांची खालील ग्रंथसंपदा प्रकाशित करण्यात आली आहे.[१]
- टॉक्स विथ श्रीअरबिंदो (३ खंड),
- करस्पाँडन्स विथ श्रीअरबिंदो (२ खंड),
- ट्वेल्व इयर्स विथ श्रीअरबिंदो,
- निरोदबरन लिखित दोन कवितासंग्रह प्रकाशित करण्यात आले आहेत. ब्लॉसम ऑफ द सन आणि निरोदबरन यांच्या ५० कविता ही दोन पुस्तके प्रकाशित करण्यात आली.
निधन
संपादननिरोदबरन यांचे १७ जुलै २००६ रोजी संध्याकाळी पाँडिचेरी येथे निधन झाले. त्यावेळी ते १०२ वर्षांचे होते. त्यांची समाधी आश्रमाच्या कॅझानोव्ह गार्डनमध्ये आहे.
संदर्भ
संपादन- ^ "Nirodbaran - author of 'Twelve Years with Sri Aurobindo'". The Mother & Sri Aurobindo : e-library (इंग्रजी भाषेत). 2023-05-16 रोजी पाहिले.