निरुपमा राव

(निरूपमा राव या पानावरून पुनर्निर्देशित)

निरूपमा राव या भारताच्या भारतीय विदेश सेवा (आयएफएस) अधिकारी आहेत. त्या अमेरिकेत भारताच्या राजदूत होत्या त्यांनी भारताच्या परराष्ट्र सचिवपदीही त्या कार्यरत होत्या. ही जबाबदारी सांभाळणाऱ्या त्या केवळ दुसऱ्या महिला आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्तापदावर नेमणूक झालेल्या त्या पहिल्या महिला असून त्या श्रीलंकेतील पहिल्या महिला हाय कमिशनर होत्या. जगातल्या सर्वात प्रभावी १०० महिलांपैकी एक म्हणून त्यांचा नामोल्लेख होतो.[]

निरूपमा राव

कौटुंबिक माहिती

संपादन

राव यांचा जन्म उत्तर केरळातील मल्लपुरम येथे झाला. त्यांचे वडील लष्करी अधिकारी होते. निरुपमा यांना दोन बहिणी आहेत. फॉरेन सर्व्हिस अधिकारी असलेल्या त्यांच्या काकांकडून ऐकलेल्या अनुभवांमुळे त्यांना ह्या कामाची प्रेरणा मिळाली. निरूपमा यांचे पती हे आय. ए .एस अधिकारी आहेत. त्यांना दोन मुले आहेत.

शिक्षण

संपादन

१९७३ साली राव यांनी नागरी सेवा परीक्षा दिली. या परीक्षेत त्या प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यावर प्रशिक्षणानंतर त्यांची नेमणूक व्हिएन्ना येथे झाली. सार्वजनिक सेवेतून निवृत्त झाल्यावर २०१४ साली ब्राउन विद्यापीठात ‘मीरा एंड विक्रम गांधी फेलो ‘ म्हणून त्यांची नेमणूक झाली.भारत-चीन संबंधांवरील पुस्तक पूर्ण करण्यासाठी त्यांना जवाहरलाल नेहरू शिष्यवृत्ती मिळाली. इतिहास विशेषतः आधुनिक भारतीय इतिहास हा त्यांच्या विशेष अभ्यासाचा विषय आहे.

कारकीर्द

संपादन
  • श्रीलंकेतील चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या मजुरांचे प्रश्न सोडविणे
  • १९८६ साली तिबेटमध्ये कैलास मानसरोवर यात्रेला निघालेल्या लोकांच्या गटाचे नेतृत्व करणे
  • १९८८ मध्ये राजीव गांधी यांच्या चीन भेटीची तयारी
  • 'महिला डिप्लोमॅट्स' संबंधीच्या एका अलीकडच्या पुस्तकाने त्यांना 'विमेन ऑफ् दि वर्ल्ड्' असे संबोधले आहे. []
 
निरुपमा राव अधिकारी व्यक्तींसह

विचार

संपादन

परराष्ट्र क्षेत्रात काम करण्यासाठी महिलांनी पुढे यावे असे निरुपमा यांना वाटते.ऊर्जा,व्यापार आणि दळणवळण, प्रादेशिक आर्थिक सहाय्य,सीमेवरील प्रश्न ,राजकीय लष्करी प्रश्न अशा विविध विषयात काम करण्यासाठी स्त्रियांना प्रशिक्षण देणे आणि स्त्रियांनी या विषयात देशाचे नेतृत्व करणे यासाठी त्या प्रयत्न करून इच्छित आहेत.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ a b किडवाई नैना,अनुवाद,गजेंद्रगडकर वर्षा,३० सामर्थ्यशाली महिला,२०१६,सकाळ प्रकाशन ,पृष्ठ २१४ ते २२३
  2. ^ किडवाई नैना लाल ,अनुवाद गजेंंद्रगडकर वर्षा, ३० सामर्थ्यशाली स्रिया,२०१६,सकाळ प्रकाशन,पृृष्ठ २१४ते२२३

बाह्य दुवे

संपादन