निरवडे
निरवडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील एक गाव आहे.
?निरवडे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | सावंतवाडी |
जिल्हा | सिंधुदुर्ग जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा मालवणी | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
भौगोलिक स्थान
संपादनहवामान
संपादनपावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. हिवाळी हंगामात येथे मोठ्या प्रमाणात "गावठी मिरची" ची लागवड केली जाते. भुईमूग, नाचणी, कुळीथ, उडीद, मका चे पिक देखील येथील शेतकरी घेतो.
लोकजीवन
संपादन२०११ च्या जनगणनेनुसार निरवडे गावाची एकूण लोकसंख्या २९२७ इतकी आहे. ६७७ कुटुंबे निरवडे गावात राहतात. १४६० पुरुष व १४६७ स्त्रियांची संख्या आहे.
प्रेक्षणीय स्थळे
संपादनश्री. देव भूतनाथ मंदिर
निरवडे गावात दर वर्षी यात्रा / जत्रा / उरूस आनंदाने साजरी केली जातात. या काळात निरवडे गावात विविध खेळ व खाद्यपदार्थची दुकाने थाटतात. मनोरंजनासाठी दशावतारी नाटक, सामाजिक तसेच ऐतिहासिक नाटक इत्यादी आयोजित केली जातात. दरवर्षी १९ एप्रिल रोजी या गावचे ग्रामदैवत "श्री. देव भूतनाथ" देवाचा वाढदिवस सोहळा थाटात साजरा केला जातो. सकाळी देवाचा अभिषेक, दुपारी आरती व गाऱ्याने संपन्न होते. भाविकांना दुपारी महाप्रसाद देखील वाढण्यात येतो. रात्री १० वाजता येथील गावकरी मिळून "सामाजिक नाटक" सादर करतात.
नागरी सुविधा
संपादनगावात "प्राथमिक आरोग्य केंद्र" आहे. "सावंतवाडी रोड" रेल्वे स्थानक अवघ्या १ किमी. अंतरावर आहे. मोपा विमानतळ ३० किमी. तर सावंतवाडी बाजारपेठ ८ किमी. अंतरावर आहे.
जवळपासची गावे
संपादनमळगाव, तळवडे, सोनुर्ली, वेत्ये, होडवडे, न्हावेली, मळेवाड, घोडेमुख
संदर्भ
संपादन१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/