निर्गुडी

(निरगुडी या पानावरून पुनर्निर्देशित)

निरगुडी किंवा निर्गुंडी ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. विविध रोग व दुखण्यांवर गुणकारी असणाऱ्या काही थोड्या वनस्पतींमध्यी निरगुडीचा समावेश होतो; स्नायु विश्रांतिसाठी, दुखणे व जळजळ कमी करण्यासाठी, संधिवात, त्वचा रोग, डोकेदुखी, इत्यादी. आयुर्वेदामध्ये सर्व प्रकारच्या रोगांसाठी निरगुडी शिलाजिताबरोबर देल्यास चालते.

वनस्पती

संपादन

निरगुडी ही बहुवर्षायू वाढणारी व एकदलीय वनस्पती आहे. उंची २ ते ५ मी तर बुंध्याचा व्यास ५-२० सेमी असतो. उंच व झुबक्यांनी वाढते. खोड (मूलस्तंभ) आखूड व जमिनीत वाढते आणि काही भाग जमिनीवर येतो. मुळे आखूड, तंतुमय आणि मोठ्या संख्येने व दाटीवाटीने वाढलेली असतात. पाने (पाती) १-१.५ मी. लांब, टोकाला निमुळती होत गेलेली आणि हिरवी असतात. निरगुडीच्या वरच्या भागात पांढरी फुले असतात.[]

लागवड

संपादन

निरगुडीची लागवड घराच्या परस बागेमध्ये कुंपणाच्या साहाय्याने केली जाते.

उपयोग

संपादन
  • निरगुडीचा पाला गरम करून सुजेवर बांधले जाते. निरगुडीच्या गरम पाल्याने सूज आणि ठणका दोन्ही थांबते.

संदर्भ

संपादन
  1. ^ महाजन, श्रीधर दत्तात्रय. देशी वृक्ष, पा.क्र. १२३.