निरंजन ज्योती

भारतीय राजकारणी
Niranjan Jyoti (es); নির্জন জ্যোতি (bn); Niranjan Jyoti (fr); નિરંજન જ્યોતિ (gu); Niranjan Jyoti (ast); Niranjan Jyoti (ca); निरंजन ज्योति (mr); Niranjan Jyoti (de); ନିରଞ୍ଜନ ଜ୍ୟୋତି (or); Niranjan Jyoti (ga); Niranjan Jyoti (sl); నిరంజన్ జ్యోతి (te); നിരഞ്ജൻ ജ്യോതി (ml); Niranjan Jyoti (nl); निरंजन ज्योति (sa); निरंजन ज्योति (hi); ನಿರಂಜನ ಜ್ಯೋತಿ (kn); ਨਿਰੰਜਨ ਜੋਤੀ (pa); Niranjan Jyoti (en); निरंजन ज्योति (ne); Niranjan Jyoti (yo); நிரஞ்சன் ஜோதி (ta) política india (es); politikari indiarra (eu); política india (ast); política índia (ca); Indian politician (en-gb); سیاست‌مدار هندی (fa); 印度政治人物 (zh); indisk politiker (da); politiciană indiană (ro); indisk politiker (sv); פוליטיקאית הודית (he); भारतीयराजनेतारः (sa); भारतीय राजनीतिज्ञ (hi); ਭਾਰਤੀ ਸਿਆਸਤਦਾਨ (pa); Indian politician (en-ca); இந்திய அரசியல்வாதி (ta); politica indiana (it); ভারতীয় রাজনীতিবিদ (bn); personnalité politique indienne (fr); India poliitik (et); Olóṣèlú Ọmọ Orílẹ̀-èdè Indian (yo); política indiana (pt); política india (gl); індійський політик (uk); indisk politikar (nn); indisk politiker (nb); Indiaas politica (nl); polaiteoir Indiach (ga); India siyaasa nira ŋun nyɛ paɣa (dag); ഇന്ത്യയിലെ ഒരു രാഷ്ട്രീയപ്രവര്‍ത്തക (ml); भारतीय राजकारणी (mr); Indian politician (en); سياسية هندية (ar); ଷୋଡ଼ଶ ଲୋକ ସଭା ସଭ୍ୟ (or); politikane indiane (sq) निरजंन ज्‍योति (hi); निरंजन ज्योती (mr); ਸਾਧਵੀ ਨਿਰੰਜਨ ਜੋਤੀ (pa)

साध्वी निरंजन ज्योती (जन्म १ मार्च १९६७) ह्या भारतीय जनता पक्ष (भाजप) च्या राजकारणी आहेत. नोव्हेंबर २०१४ मध्ये त्यांची अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. [] ३० मे २०१९ रोजी, त्यांची नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात ग्रामीण विकास मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली.

निरंजन ज्योति 
भारतीय राजकारणी
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखइ.स. १९६७
हमीरपूर
नागरिकत्व
व्यवसाय
राजकीय पक्षाचा सभासद
पद
  • १६ वी लोकसभा सदस्य
  • १७वी लोकसभा सदस्य
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

२०१२ च्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्या उत्तर प्रदेश विधानसभेत हमीरपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होत्या.[] २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांनी लोकसभेत उत्तर प्रदेशातील फतेहपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.[]

आयुष्य आणि कारकीर्द

संपादन

निरंजन ज्योती यांचा जन्म १ मार्च १९६७ रोजी उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील पटेवरा गावात झाला. त्यांचे वडील अच्युतानंद आणि आई शिव काली देवी आहे. [] त्यांचा जन्म निषाद जातीच्या कुटुंबात झाला. []

१४ जून २०१४ रोजी भानू पटेल नावाच्या एका व्यक्तीने आणि त्याच्या तीन साथीदारांनी ज्योतीवर गोळीबार केला जेव्हा त्या लखनौ येथील आवास विकास कॉलनीमध्ये एका कार्यक्रमातून परतत होत्या. त्या सुरक्षितपणे बचावल्या पण त्यांचा अंगरक्षक जखमी झाला. []

त्या विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय सचिव आणि उत्तर प्रदेशातील भाजपच्या राज्य सचिव होत्या. मे २०१९ मध्ये, ज्योती ग्रामीण विकास राज्यमंत्री बनल्या. []

वैयक्तिक मते आणि विवाद

संपादन

१ डिसेंबर २०१४ रोजी, [] त्यांनी एका जाहीर सभेत, "दिल्लीतील सरकार रामाच्या मुलांनी चालवायचे की हरामीच्या हे तुम्हीच ठरवायचे आहे" असे विरोधी पक्षनेत्यांचा उल्लेखात त्या बोलल्या. [] या विधानामुळे संसदेत गदारोळ झाला. [] त्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावर खेद व्यक्त केला आणि माफी मागीतली.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ a b "From storyteller to minister; Sadhvi Niranjan Jyoti". द इंडियन एक्सप्रेस. 12 November 2015. 24 November 2015 रोजी पाहिले.
  2. ^ "Sadhvi Niranjan Jyoti". 2021. 10 April 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 April 2022 रोजी पाहिले.
  3. ^ a b "Jyoti,Sadhvi Niranjan". Lok Sabha. 24 November 2015 रोजी पाहिले.
  4. ^ "BJP MP Sadhvi Niranjan Jyoti attacked, escapes unhurt". द इकोनॉमिक टाइम्स. 15 June 2015. 2015-11-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 24 November 2015 रोजी पाहिले.
  5. ^ PM Modi allocates portfolios. Full list of new ministers
  6. ^ a b "After abusive rant, Union minister Sadhvi Niranjan Jyoti expresses regret in Parliament". इंडिया टुडे. 2 December 2014. 24 November 2015 रोजी पाहिले.
  7. ^ "Ramzada vs haramzada: Outrage over Union Minister Sadhvi's remark". द इंडियन एक्सप्रेस. 2 December 2014. 24 November 2015 रोजी पाहिले.
  8. ^ "After uproar in House, Sadhvi Niranjan Jyoti says she is ready to apologise for 'haramzadon' remark". द इंडियन एक्सप्रेस. 2 December 2015. 24 November 2015 रोजी पाहिले.