निमगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.

  • निमगाव हे खंडोबा मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे गाव , निमगाव हे ग्राम नाव अनेक गावांचे असल्याने ओळख पटवण्या साठी या नावास जोड देण्याची प्रथा आहे, जुन्याकाळी या निमगाव जवळ नागना नावाचे गाव होते, त्यामुळे या निमगावचा उल्लेख निमगाव – नागना असा होत असे, काळाचे ओघात नागना गाव उध्वस्त झाले आणि निमगाव जवळील दावडी या दुसरया गावावरून हे गाव निमगाव – दावडी या नावाने प्रसिद्ध झाले, आत्ता हे गाव निमगाव – खंडोबा या नावाने रूढ होत आहे, पेशवाई काळात पेशव्यांचे दिवाण चंद्रचूड यांचे येथे वास्तव्य होते त्यामुळे या गावास ऐत्यासिक महत्व ही होते. हे गाव भीमा नदी काठी वसलेले आहे तेथील भग्न अवस्थेतील घाट, वाडे आपल्या पुर्व वैभवाची साक्ष देत आहेत.
  ?निमगाव

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर खेड
जिल्हा पुणे जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/
  • निमगाव – खंडोबा हे गाव पुणे जिल्ह्यात पुणे- नासिक मार्गावरील खेड तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या राजगुरुनगर पासून ६ किमी अंतरावर आहे. निमगावचे उत्तरेस १.५ किमी अंतरावरील टेकडीवर खंडोबाचे मंदिर आहे. येथे थेट गाडी मार्ग मंदिरा जवळ जातो. पायरी मार्गानेही येथे पोहचता येते.

कोटाचे दक्षिण बाजूने सुमारे १०० पायरी चढून कोटा पर्यंत जाता येते. पायरी मार्गाचे सुरुवातीस एक पूर्वाभिमुख भैरवनाथाचे मंदिर आहे.

  • कोटाचे पुर्व बाजूने ही पायरी मार्ग आहे या पायरी मार्गाचे दक्षिण बाजूस मंदिराचे कोटाचे पुर्व बाजूस हेगडी प्रधानाचे पश्चिमाभिमुख मंदिर असून मंदिरात हेगडीची बैठी दगडी मूर्ती आहे.

समोरच मंदिराच्या कोटाचे पुर्व प्रवेशद्वार दिसते या द्वारावर नागखाना बांधलेला आहे.

  • पुर्वद्वाराचे दोन्ही बाजूस छोट्या मंडपी असून त्या मध्ये दक्षिण बाजूस गणपती व उत्तर बाजूस हनुमान मूर्ती आहेत. मंदिराचा कोट मजबूत दगडी बांधकामाचा असून चारही बाजूस बुरुज आहेत. या तटाची उंची सुमारे २५ फुट आहे कोटाचा पश्चिम दरवाजा कायम स्वरूपी बंद केलेला आहे. कोटास आतील बाजूने ७६ ओवारी आहेंत कोटाची फरासबंदी लांबी १९५ फुट व रुंदी ११८ फुट आहे या कोटाचे काम ईस १७६९ मध्ये बडोद्याचे सरदार मल्हारराव गायकवाड यांनी केलेले आहे.
  • पुर्वाद्वारातून कोटात प्रवेश केला की दरवाज्याचे उत्तर बाजूस दोन घोडे व वृंदावन आहे मंदिराचे समोर तीन भव्य दिपमाळा व दोन दिपमाळाचे चोथरे आहेत.

मंदिराचे समोर एका मेघदंबरीत नंदी प्रतिमा आहे.

  • समोरच दिसते ते खंडोबाचे पूर्वाभिमुख मुख्यमंदिर मंदिराची रचना सदर, मंडप, गर्भगृह, अशी आहे सदर पंचकमानी असून दोन्ही बाजूचे कमानीत सोफे आहेत मधील कमानी समोर मंडपाचे प्रवेशद्वार आहे. मंडप घुमटकर असून आठ कमानी युक्त खांब विरहित आहे, मंडपास पुर्वाद्वारा बरोबर दक्षिण व उत्तरे कडून ही दरवाजे आहेत. दक्षिण व उत्तरद्वाराचे दानही अंगास प्रत्येकी दोन खोल्या आहेत दक्षिण बाजुस देवाचे शेजघर आहे.
  • मंडपाचे पश्चिम बाजुस गर्भगृह आहे गर्भगृहात मध्यभागी एका योनीत खंडोबाची पंचलिंगे आहेत ती पितळी मुखवट्याने झाकलेली असतात, यांचे मागे चोथर्यावर धातूच्या बानाई, खंडोबा, म्हाळसा व खंडोबा म्हाळसा यांच्या उत्सव मूर्ती आहेत. या उत्सवमुर्तीचे पाठीमागे भिंतीत उभी बानाई बसलेला खंडोबा व म्हाळसा यांच्या मोठ्या मूर्ती आहेत.
  • हे मंदिर निमगाव खंडोबाचे तिसरे स्थान होय, देव अरुडमल येथील धामणटेक येथे प्रथम व नंतर मुख्य मंदिरामागील टेकडीवर व तेथून येथे प्रगट झालेचे मानले जाते.

या ठिकाणी रविवार दि. २६ नोव्हेबर १४२४ मार्गशीर्ष ५ रोजी देव लिंगरूपाने प्रगट झाले व ग्रामस्थानी तेथे मंदिर बांधले, पुढे ईस १७३८ मध्ये गंगाधर यशवंत व बाजी गंगाधर चंद्रचूड यांनी या मंदिराचे पुनर्निर्माण केले. मंदिराचे गर्भगृह मंडप यावर शिखरे आहेत.

  • मंदिराचे प्रदक्षिणा मार्गावर गर्भगृहच्या पाठ भिंतीस एक पश्चिमाभिमुख देवडी असुन त्या मध्ये म्हाळसाबाई शिळा व महिषासुर मर्दिनी भवानीची दगडी मुर्ती आहे.
  • मंदिराचे परिसरात मंदिराचे दक्षिण बाजुस एक थडगे आहे ते खंडोबाची निस्सीम भक्त असलेल्या मुरुळीचे असल्याचे सांगितले जाते. मंदिराचे कोटाचे सज्यावर जाणेसाठी उत्तर व दक्षिण बाजुने पायरी मार्ग आहे. कोटाचे सज्या व नगारखान्या वरून परिसराचे विहंगम दृश्य दिसते. मंदिराचे कोटाचे पश्चिमेस एक छोटी टेकडी दिसते या टेकडीवर एक पूर्वाभिमुख देवडी आहे यात पंचलिंग असुन समोर नंदी आहे. या देव्डीस कडेपठार असे म्हणतात खंडोबाचे हे मंदिरातील स्थाना अगोदरचे दुसरे स्थान या ठिकाणाहून देव आजचे मंदिराचे ठिकाणी आल्याचे मानले जाते.

भौगोलिक स्थान

संपादन

हवामान

संपादन

येथे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भरपूर पाऊस पडतो.जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीत कोरडे हवामान असते.जुलै महिना हा सर्वात आर्द्र महिना असतो.मार्च हा सर्वात शीतल महिना असतो. वार्षिक पर्जन्यमान २,२६० मिमी असते.

लोकजीवन

संपादन

प्रेक्षणीय स्थळे

संपादन

नागरी सुविधा

संपादन

जवळपासची गावे

संपादन

संदर्भ

संपादन
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate