निमगाव सावा
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
निमगाव सावा हे पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागाततल्या जुन्नर तालुक्याच्या पूर्वेला दक्षिण-वाहिनी कुकडी नदीच्या तीरी वसलेले एक शेतीप्रधान गाव आहे. चांगले रस्ते, वीज, पाणी आदी सोयी असल्याने निमगाव सावा हे विकासाचे एक 'मॉडेल व्हिलेज' म्हणून ओळखले जाते.
निमगाव सावाच्या पूर्वेला पारगाव तर्फे आळे हे गाव, दक्षिणेला औरंगपूर व भागडोबा (सुळक्या) डोंगर व वळती आंबेगाव तालुका, पश्चिमेला सुलतानपूर-शिरोली, उत्तरेला कुकडी नदी आहे.
गावात पश्चिमेला गाडगे मळा बागवाडी, शिवमळा, पाईनमळा, खराडी, बोऱ्हाडेमळा, गोकुळमळा, गहिणेमळा, मतेमळा, खरसड व मंचररोड, दक्षिणेला घोडेमळा रामवाडी, ठिके, खाडेमळा, शेकेमळा, खामगाव हे पुनर्वसित गाव व कॉलेजवस्ती, पूर्वेला पटाडी,कारवाडी भालेरावमळा, जावळेवस्ती, कारवस्ती, मिरावस्ती, पाचपडाळ, कारफाटा वस्ती], मध्यवर्ती [गावठाण] आदी ठिकाणे आहेत.
निमगाव सावा हे एक जुन्नर तालुक्याच्या पूर्वेला असून मध्यवर्ती बाजारपेठेचे गाव आहे. गावात शासकीय कार्यालये, सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्र, बँक/पतसंस्था, शाळा/महाविद्यालय, लघु उद्योग व पेट्रोल पंप आदी गोष्टी आहेत. इ.स. २०११ च्या खानेसुमारीनुसार गावची लोकसंख्या ५१००पेक्षा जास्त आहे . सन २००१मध्ये ती ४८०० होती.
शैक्षणिक संस्था : निमगाव सावा ह्या गावात आठ आंगणवाड्या, एक पूर्व प्राथमिक, दोन प्राथमिक, एक माध्यमिक व दोन उच्च माध्यमिक शाळा, एक महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांसाठी एक वसतीगृह आहे.
वैद्यकीय स्थिती- प्राथमिक आरोग्य केंद्र-१, खासगी दवाखाना-४
अर्थ स्थिती- बँक-१, पतसंस्था-५
सामाजिक स्थिती- मुख्यत्वे करून हिंदु, मुस्लिम व बौद्ध इ.
ऊस, कांदा, कोबी, फ्लॉवर, टॉमेटो, गहू, बाजरी, ज्वारी, भुईमूग, मूग व अन्य कडधान्ये ही पिके, आंबा, केळी, डाळिंब, चिकू, सिताफळ, नारळ ही फळे, फळभाज्या, भाजीपाला व फुले अशी विविध प्रकारची शेती निमगाव सावामध्ये केली जाते. गावात पडणाऱ्या पावसाचे स्वरूप मध्यम संततधार व जोरदार पडणारा पाऊस असे आहे. डोंगराळ भाग असल्यामुळे ह्या गावाचा परिसर बिबट्याप्रणव क्षेत्र म्हणून घोषित झाला आहे.