निजाम सागर (bho); نظام ساگر (ur); Nizām Sāgar (ceb); निझामसागर (mr); నిజాంసాగర్ ప్రాజెక్టు (te); Nizam Sagar (en); Přehrada Nizam Sagar (cs); 尼扎姆薩加爾水庫 (zh); निज़ाम सागर (hi) dam in India (en-gb); (stuw)dam in India (nl); dam in India (en); भारत के आंध्रप्रदेश में एक बांध (hi); Talsperre in Indien (de); سد في الهند (ar); dam in India (en); dam in India (en-ca); přehrada na řece Manjira v Indii (cs); తెలంగాణలో నీటి పారుదల ఆనకట్ట (te) Nizam Sagar Dam (en)

आंध्र प्रदेश राज्याच्या निझामाबाद जिल्ह्यातील हा मानवनिर्मित जलाशय निझामाबादच्या दक्षिणेस सुमारे ६० किमी. अंतरावर गोदावरी नदीच्या मांजरा उपनदीवरच्या १९३१ साली बांधलेल्या धरणामुळे तयार झाला आहे. या तलावामुळे १२९ चौ.किमी. क्षेत्र व्यापले आहे. निझामसागरची पाणी साठविण्याची क्षमता ८,२२० लाख घनमीटर आहे. या धरणाच्या भिंतीची लांबी २४ किमी., रुंदी १६ किमी. व उंची ३८ मीटर आहे.

निझामसागर 
dam in India
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारधरण
याचे नावाने नामकरण
स्थान तेलंगणा, भारत
Located in/on physical featureमांजरा नदी
Map१८° १२′ ०९″ N, ७७° ५५′ २६″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

निझामसागर जलाशयापासून काढलेल्या ११२ किमी. लांबीच्या कालव्यामुळे निझामाबाद जिल्ह्यातील आरमूर, बान्सवाडा, बोधन या तालुक्यांतील सुमारे १,१०,००० हेक्टर जमिनीस पाणीपुरवठा केला जातो. जलाशयाच्या खाली एक हंगामी स्वरूपाचे विद्युत निर्मिती केंद्र १९५६ साली सुरू झाले. हे केंद्र येर्रागड्डा येथील हुसेनसागर औष्णिक केंद्राशी जोडले असल्यामुळे हुसेनसागर येथील कोळशाची बचत झाली आहे.

जलाशयातील उंचवट्यावर एक सुंदर बगीचा व बंगला असून तेथून जलाशयाचा व आजूबाजूचा विस्तृत मनोरम देखावा दिसतो. जलाशयाच्या किनाऱ्यावर पर्यटकांच्या सोयीसाठी विश्रामगृहे आहेत. सध्या हे सुंदर पर्यटनस्थल समजले जाते. हैदराबाद-मनमाड लोहमार्गावरील कामारेड्डी या जवळच्या रेल्वे स्थानकापासून निझामसागर मोटार रस्त्याने ४१ किमी. अंतरावर आहे.