लिंबू
कागदी लिंबू हे भारतीयांच्या अन्नात रोजच्या वापरात असलेले एक आंबट चवीचे फळ आहे. हे फळ कच्चे असताना हिरवे व पिकल्यावर पिवळ्या रंगाचे होते. लिंबाचे ईडलिंबू आणि कागदी लिंबू असे दोन मुख्य प्रकार आहेत. कागदी लिंबाचे अनेक उपयोग आहेत. याचे सरबत, लोणचे इत्यादी करतात. लिंबू हे फळ आहे.
लिंबाचे झाड
संपादनलिंबाच्या झाडाला लिंब किंवा निंब म्हणतात. हे झुडुप असते. पान जेथे देठाला चिकटते, तेथे एक लहानसा पंख असतो. देठाला लहान काटे असतात. पानाच्या बेचक्यात फूल आणि फळ येते. लिंबाचे सालीवरून अनेक प्रकार होतात, ते असे. जाड साल, पातळ साल, पिवळी साल, हिरवी साल, सपक साल आणि खरखरीत साल. बगदाद येथे दुप्पट आकाराची आणि तांबूस फळे देणारा एक प्रकार आहे. सिसिली बेटात लिंबाचे अमाप पीक येते अमेरिका आणि इंग्लंड या देशांत सिसिलीची लिंबे जातात.
लिंबाच्या अनेक जाती आहेत, महाळुंग, ईडलिंबू, जंबीर, कागदी लिंबू, वगैरे.
लिंबू सेवनाचे फायदे
संपादन१. लठ्ठपणा कमी करण्यासाठी :- दररोज सकाळी उपाशी पोटी गरम पाण्याबरोबर लिंबू सेवन केल्यास अतिरिक्त चरबी कमी होते.
२. पित्त झाल्यास रोज लिंबाचे सरबत घेतल्यास भूक वाढते. अन्न पचते व शौचास साफ होते.
३.वाळलेले लिंबू मधात घालून चाटण म्हणून घेतल्यास उचकी तसेच ओकारी थांबण्यास मदत होते. अंगाला कंड सुटत असल्यास लिंबाचा रस खोबरेल तेलात मिसळून अंगास चोळतात. व गरम पाण्याने स्नान करतात. कंड कमी होते..
४.नायटे व डोक्यातील खवडे यावरही लिंबाचा रस चोळल्याने चांगला परिणाम होतो.
५. सुंदर केसांसाठी लिंबू :
जर डोक्यावरचे केस किंवा टाळूवरची त्वचा तेलकट असेल तर त्यावर लिंबू लावतात. जास्त प्रमाणात लावल्यास केस ब्लीच होतात.. मात्र थोडासा लिंबाचा रस हाताने केसांच्या मुळास लावणे योग्य असेल. रोजचा किंवा सतत लिंबाचा उपयोग केसांवर म करता फक्त गरजेनुसार करतात. मरगळलेल्या केसांना लिंबाचा रस चमक आणि तजेलदार बनवतात. कृत्रिम उत्पादनांचा वापर न करता केस सुंदर आणि सुगंधी होतात. गरमीच्या दिवसात घामाने आणि धुळीने केस मळतात, त्यामुळे लोक केस वारंवार धुतात. लिंबाचा योग्य प्रमाणातला वापर केसांना चमकदार व गुळगुळीत बनवतो. अतिवापराने केस कोरडे होऊ शकतात.
उपयोग
संपादनलिंबाचे अनेक औषधी उपयोग आहेत. लिंबू उभे कापून त्यावर खडीसाखर घालून चोखल्यास ओकारी थांबते. पोटदुखी थांबण्यासाठी आले व लिंबाचा रस साखर घालून सेवन करतात. अजीर्णावर लिंबू फार उपयुक्त आहे. ते आडवे कापून त्यावर सुंठ किंवा सैंधव (मीठ) घालून निखाऱ्यावर गरम करतात आणि वारंवार चोखतात. त्यामुळे करपट ढेकर, ओकारी, पोटफुगी वगैरे त्रास कमी होतो. पित्त झाल्यास रोज लिंबाचा सरबत घेतात. त्याने भूक वाढते,अन्न पचते व शौचास साफ होते.
अन्न खाण्याची इच्छा होत नसेत तर लिंबाची चतकोर फोड सालासकट खाल्ल्यास उपयोग होतो.
लिंबाची अन्य भाषांतली नावे
संपादन- इंग्रजी- अॅसिड सोअर लाईम, लेमन
- कानडी- निंबे, लिंबे
- गुजराती- निंबू, खटलिंबू
- शास्त्रीय नाव- Citrus aurantifolia (सायट्रस ऑरंटिफोलिया, जात अॅसिडा), Limon aurantifolia; Variety- acida)
- संस्कृत- आम्लसार, निम्बु, निम्बुक, रोचना, लिम्पका, शोधना
- हिंदी- कागज़ी निंबू, निंबू, नेबू, लिंबू, लेबू
लिंबाच्या महाळुंग नावाच्या जातीची अन्य नावे
संपादन- कानडी- मदाला, महाफल, रूचक
- गुजराती- तुरंज, बालंक, बिजोरू
- मराठी- महाळुंग. मवालुंगा
- शास्त्रीय नाव- Citrus medica
- संस्कृत- अम्लकेशर, महानिंम्बू, मातुलुंग, फलपूरक, बीजपूरक (पहा : उपायानार्थमागच्छ गृहीत्वा बीजपूरकम् - मालविकाग्निमित्र ३.१), रूचका
- हिंदी- कुतला, तुरंज, बिजौरा, बोरा निंबु
लिंबाच्या ईडलिंबू नावाच्या जातीची अन्य नावे
संपादन- इंग्रजी- लेमन
- कानडी- देवमादला, दोड्डा गाजा, दोड्डा निंबा, माटुंगा, मातालुंगा, समहानिंबू, हराली
- गुजराती- मोटालिंबा, दोडिंगा
- मराठी- ईडलिंबू, थोरालिंबू
- शास्त्रीय नाव- Citrus medica, Variety Limonum
- संस्कृत- दंतशठ
- हिंदी- जंबिरा, पहाडी निंबु, बडानिंबु
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |