नाहूर हे मुंबईतील उपनगरीय रेल्वेमार्गावरील एक स्थानक असून ते भांडूप पूर्व या उपनगरात येते, मुलुंड आणि भांडुप या स्थानकातील अंतर कमी करण्यासाठी नाहूर या स्थानकाची साधारण १० वर्षापूर्वी बांधणी करण्यात आली. नाहूर हे मुळात साधारण ३०-३५ आगरी-कोळी कुटुंबांची वसती असलेले गाव मुलुंड पश्चिम भागात येते, परंतु नाहूर रेल्वे स्थानक असलेला भाग हा भांडुप (पूर्व) या भागात येतो.

इमारतीची नवीन बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याने या स्टेशन परिसरातील जमिनींचे भाव आता गगनाला भिडलेले आहेत. नव्याने राहावयास आलेल्या मंडळीकडून हा भाग नाहूर पूर्व असा सांगण्यात येतो, जो मुळात अस्तित्वात नाही.