नारायण मल्हार जोशी (जन्म : गोरेगांव-कुलाबा जिल्हा, ५ जून १८७९; - ३० मे १९५५) हे भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक होते.[ चित्र हवे ] ते मराठी लेखक वामन मल्हार जोशी आणि संस्कृत पंडित महादेव मल्हार जोशी यांचे बंधू होते.

ना.म. जोशी यांचे वडील वेदविद्यासंपन्न असून प्रसिद्ध फलज्योतिषी होते. नारायणरावांचे गोरेगाव या जन्मगावीच वेदाध्ययन व प्राथमिक शिक्षण पार पडले. वडील भाऊ महादेवराव यांच्या आग्रहावरून ते सन १८९३मध्ये इंग्रजी शिक्षणाकरिता पुण्याला गेले. . न्यू इंग्‍लिश स्कूलमधून मॅट्रिक व १९०१ मध्ये डेक्कन कॉलेजातून बी. ए. उत्तीर्ण झाले. पदवी मिळविल्यानंतर जोशींनी सहा महिने अहमदनगर येथे दुष्काळपीडितांसाठी काढलेल्या सरकारी अन्नसत्रात काम केले. १९०१–१० या काळात अहमदनगर व पुणे येथे खाजगी शाळांमधून, तर मुंबई व रत्नागिरी येथील शासकीय विद्यालयांमधून अध्यापन केले. हा अध्यापनाचा अनुभव जोशींना १९२२–४७ या काळात मुंबईमध्ये प्रौढांसाठी व औद्योगिक कामगारांकरिता प्रशिक्षणवर्ग चालविण्यास फार उपयोगी पडला.


ना.म. जोशी यांनी कामगारांचे नेते म्हणून कामगारांच्या कल्याणासाठी इ.स. १९११ मध्ये बॉम्बे सोशल सर्व्हिस लीग ही संघटना स्थापन केली. त्यांनी आयुष्यभर कामगारांच्या कल्याणाचेच काम केले. त्यांच्या नेतृत्वात पुढे १९२९ साली AITUF (The All India Trade Union Congress)ची स्थापना केली. ते मवाळ नेते होते.

एन.एम. जोशी मार्गसंपादन करा

मुंबईतील भायखळा आणि प्रभादेवी ही ठिकाणे जोडणाऱ्या डिलाईल (Delisle) रोड नावाच्या महत्त्वाच्या रोडचे नाव बदलून ते कधीकाळी ना.म. जोशी मार्ग झाले असले, तरी नागरिक, टॅक्सीचालक त्याला जुन्या नावानेच ओळखतात. हा चार किलोमीटर लांबीचा राजमार्ग सेंट्रल रेल्वेच्या रुळांना जवळजवळ समांतर धावतो. त्याच्या मार्गावर भायखळा, चिंचपोकळी, करीरोड, परळ, एलफिन्स्टन रोड आणि लोअर परेल ही पाच रेल्वे स्टेशने येतात.

कौटुंबिकसंपादन करा

नारायण मल्हार जोशी हे मराठी लेखक वामन मल्हार जोशी आणि संस्कृत पंडित महादेव मल्हार जोशी यांचे बंधू होते.

ना.म. जोशी यांची पत्नी रमाबाई १९२७ साली निधन पावली. त्यांच्या दोन मुलींपैकी ज्येष्ठ मुलगीही १९३४ मध्ये मरण पावली. त्यांचे दोन पुत्र सुविद्य व सुस्थितीत आहेत.कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भसंपादन करा