नारायणकाका ढेकणे (जुलै ३, इ.स. १९२७ - नोव्हेंबर ६, इ.स. २०१२) हे भारतीय आध्यात्मिक गुरू सिद्धयोगाचे प्रचारक होते. इ.स. १९५० मध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना लोकनाथ महाराजांकडून त्यांनी महायोगाची व आजन्म ब्रह्मचर्याची दीक्षा घेतली होती. इ.स. १९८५ मध्ये ते महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा विभागातून अधीक्षक अभियंता पदावरून निवृत्त झाले. त्यानंतर परमपूज्य श्री. लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज महायोग ट्रस्ट या संस्थेची त्यांनी नाशिक येथे आध्यात्मिक प्रचारकार्यासाठी स्थापना केली.


संदर्भ संपादन