नायजेरिया एरवेझ ही नायजेरियामधील विमानवाहतूक कंपनी होती. या कंपनीची स्थापना १९५८मध्ये झाली. १९७१पर्यंत या कंपनीला डब्ल्यूएएसी नायजेरिया असे नाव होते. याचे मुख्य ठाणे अबुजामधील मुर्तला मुहम्मद आंतरराष्ट्रीय विमानतळावर होते व पश्चिम आफ्रिकेतील प्रमुख शहरे आणि युरोप, उत्तर अमेरिका आणि अरब देशांतील निवडक शहरांना येथून विमानसेवा होती.

१९६१पर्यंत नायजेरियाच्या सरकारकडे याची ५१% मालकी होती. १९६१मध्ये सरकारने सगळी कंपनी विकत घेतली व तिला राष्ट्रीय विमानवाहतूक कंपनीचा दर्जा दिला.

ही कंपनी २००३मध्ये बंद पडली.