नादिया मुराद (जन्म १९९३[१]) ह्या इराकमधील यझिदी समाजातील मानवाधिकार कार्यकर्त्या आहेत. त्या २०१६ पासून मानवी तस्करीतील बचावलेल्यांच्या सन्मासाठीच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदिच्छादूत आहेत.

नादिया मुराद
जन्म नादिया मुराद बिन तहा
१९९३
पेशा मानवाधिकार कार्यकर्ती
पुरस्कार नोबेल शांतता-पुरस्कार २०१८
संकेतस्थळ
http://www.nadiamurad.org/

अत्त्याचार व सुटका संपादन

नादिया मुराद ह्या इराकमधील कोचो ह्या गावात जन्मल्या. त्यांचे कुटुंब शेतकरी होते. त्या उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षण घेत होत्या आणि इतिहास ह्या विषयाचे शिक्षक बनण्याची आणि रंगभूषाकार बनण्याची त्यांची इच्छा होती. [२] ३ ऑगस्ट २०१४ रोजी त्यांच्या गावावर आयसिस ह्या अतिरेकी संघटनेने हल्ला केला. नादिया ह्यांच्या ९ भावांपैकी ६ जण जागच्या जागी मारले गेले. हजारो महिला आणि मुले ह्यांसह नादिया आणि त्यांच्या दोन बहिणींना गुलाम म्हणून कैद करण्यात आले. त्यांच्यावर धर्मांतर लादण्यात आले. त्यांना लैंगिक छळ सहन करावा लागला आणि गुलाम म्हणून विकण्यात आले. त्यांच्या आईला ठार मारण्यात आले. अनेक पाशवी अत्याचार सहन केल्यावर त्यांना निसटण्यात यश मिळाले. त्यांनी जर्मनीत आश्रय घेतला. [२]

अनुभवकथन संपादन

नादिया मुराद ह्यांचे आयसिसच्या छळछावणीतील अनुभवांविषयीचे अनुभवकथन दि लास्ट गर्ल ह्या नावाने प्रकाशित झाले आहे.[३]

नोबेल शांतता-पुरस्कार संपादन

नादिया मुराद आणि देनिस मुक्वैगी ह्यांना संयुक्तपणे २०१८चा नोबेल शांतता-पुरस्कार जाहीर झाला आहे.[४]


संदर्भनोंदी संपादन

संदर्भसूची संपादन

  • लोकसत्ता टीम. "व्यक्तिवेध : नादिया मुराद". २९ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले.
  • "नादियाची कथा". २९ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले.
  • "दि लास्ट गर्ल". ०३ डिसेंबर २०१७ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  • "नोबेल पुरस्काराचे प्रकटन". ०७ ऑक्टोबर २०१८ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)