Imbox content.png
मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाच्या/मजकुराच्या विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रतेबद्दल साशंकता आहे. हा साचा लावलेल्या लेखाबद्दल/विभागाबद्दल/मजकुराच्या विश्वकोशीय उल्लेखनीयतेबाबत साधक बाधक चर्चा होणे अभिप्रेत आहे. जर उचित उल्लेखनीयता स्थापित करण्यात आली नाही, तर हा लेख, दुसऱ्या लेखात विलीन /पुनर्निर्देशित किंवा पान/विभाग/मजकूर न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास संबंधित पान/विभाग/मजकूर वगळला जाऊ शकतो. सुयोग्य आणि विश्वासार्ह संदर्भ उपलब्ध करुन दिल्यास अथवा माहितीस दुजोरा प्राप्त करुन दिल्यास ज्ञानकोशीय उल्लेखनीयतेबाबत निर्णय करणे सोपे होऊ शकते.
त्रुटी: कृपया हा साचा मुख्य नामविश्वात/लेखात वापरू नका.

१८४३ मध्ये विष्णूदास भावे यांच्या "सीतास्वयंवर" या मराठी नाटकाचा प्रयोग झाला मराठी नाट्य वाङमयाचा उदय म्हणून या नाटकाकडे पाहिले जाते. १८५५ मध्ये महात्मा फुले यांनी तृतीय रत्न हे आशय-विषय आणि भाषा अभिव्यक्ती या सर्व बाबतीत एक स्वतंत्र नाटक लिहिले. त्यानंतर अण्णासाहेब किर्लोस्करांच्या १८८० च्या संगीत शाकुंतल या नाटकापासून मराठी रंगभूमीवर संगीत नाट्य पद्धतीचा नवा संप्रदाय उदयास आला. इंग्रजीतील ऑपेरा या नाट्य प्रकाराच्या धर्तीवर किर्लोस्करांनी मराठी नाट्य संगीत शाकुंतलच्या रूपाने एक निराळाच प्रकार सुरू केला.शाकुंतल हे भाषांतरित नाटक आहे. त्यानंतर त्यांनी महाभारतातील सुभद्राहरणाची कथा आणि मोरोपंत तद्विषयक आख्यान यांचा आधार घेऊन संगीत सौभद्र हे स्वतंत्र नाटक लिहिले.[ संदर्भ हवा ]

मराठी नाट्यवाड:मय इतिहास लेखन मराठी साहित्य अफाट आहे परंतु मराठी वाड्मयाचा परिपूर्ण असा इतिहास आजपावेतो सिद्ध झालेला नाही.जो इतिहास लिहिला गेला;तो परिपूर्ण तर नाहीच!शिवाय त्यावर ज्या इतिहासलेखनदृष्टीचा प्रभाव आहे.त्या प्रभावामुळे नाट्यवाड्मय लेखन परंपरा दुर्लक्षित राहिली.तसेच वाड्मयेतिहासलेखकाचा पक्षपातीपणा आणि सदोष विश्लेषण पद्धतीमुळेही मराठी वाड्मयेतिहासलेखन एकांगी-एकसुरी बनलेले आहेत.मराठीत इतिहास लेखनाची परंपराही फार दीर्घ नाही. ब्रिटीश उत्तरकाळापासून मराठी वाड्मयेतिहासलेखनाचे काही प्रयत्न झालेले आहेत.त्यावरही वसाहतिक इतिहास लेखनाची छाप आहे.वाड्मयेतिहासलेखन कसे करावे?याविषयीही मराठीत वाद आहे.त्यामुळेच मराठी वाड्मयेतिहासलेखनाचे पद्धतीशास्र सैद्धांतिक पातळीवर निर्माण होऊ शकलेले नाहीत.. म्हणूनच समग्र मराठी साहित्याची एकसंधपणे समतोल दृष्टी ठेवून यथोचित नोंद घेऊ शकेल असे इतिहासग्रंथ सिद्ध होऊ शकलेले नाहीत.अलिकडच्या काळात असे इतिहासलेखनाचे प्रयत्न सुरू झालेले आहेत.त्यातील एक महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे प्रा.दत्ता भगत यांचा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेला ‘मराठी नाटक आणि रंगभूमीचा इतिहास’हा होय. आपल्या सखोल चिंतनातून प्रा.दत्ता भगत यांनी या ग्रंथातून आरंभापासून ते इ.स.१९९० पर्यंतच्या मराठी नाटक आणि रंगभूमीचा विस्तृत आढावा घेतलेला आहे.नाटक(संहिता)आणि रंगभूमी(प्रयोग) यांच्या एकत्रित इतिहासलेखनाचा हा मराठीतील पहिलाच प्रयत्न असल्याने या ग्रंथाचे महत्त्व लक्षात घेणे आवश्यकता आहे.