नाटकाचे घटक
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
रंगभूमीवर सादर होणाऱ्या नाटकाचे महत्त्वाचे घटक :
१. लिखित स्वरूपातील नाटक म्हणजेच नाट्यसंहिता
२. अभिनेत्यांचा संच
३. दिग्दर्शक
४. नेपथ्य
५. रंगभूषा
६ .वेशभूषा
७. प्रकाश योजना
८. संगीत योजना
९. प्रेक्षक व प्रेक्षागृह
१. नाट्यसंहिता : नाटककाराने एखाद्या विषयावर लिहिलेल्या नाट्यलेखनाला किंवा हस्तलिखिताला नाट्यसंहिता असे म्हणले जाते. त्यामध्ये कथानक, व्यक्तिरेखा,नाट्य संवाद, अंक - प्रवेश, इत्यादी रचना घटक असतात. या संहितेमध्ये नाटककाराने स्थळ-काळ -कृती यांचा उल्लेख केलेला असतो. तसेच नाटकातील व्यक्तिरेखांनी कसे वागावे, कसे बोलावे यासंबंधी काही सूचनाही केलेल्या असतात. नाट्यसंहिता हा रंगभूमीवरील होणाऱ्या प्रयोगाचा आरंभबिंदू आहे. या सिते दिग्दर्शकाला काही मार्गदर्शक सूचना केलेल्या असतात. नाट्यसंहिता प्रयोगाआधी किंवा प्रयोगानंतर प्रकाशित होते .
नाटकाचे संविधानक
संपादननाट्यसंहिता ही प्रयोगरूपात सिद्ध होते, तेव्हा नाट्यानुभव भारून टाकतो. केवळ नाट्यसंहितेचा विचार म्हणजे नाटकाचे संविधानक, व्यक्तिरेखा, शैली इ. घटकांच्या परस्परसंबंधांचा विचार होय.याविविध घटकांचा संश्लिष्ट, एकात्म आकृतिबंध म्हणजे नाटक होय.नाटकाचे संविधानक म्हणजे एकामागोमाग एक येणाऱ्या कार्यकारण-भावयुक्त अशा घटनांची शृंखला वा मालिका.ही मालिका चतुराईने व सफाईने गुंफिली पाहिजे. साम्यविरोध धर्मानुसार घटनांची निवड केली अथवा सुखात्मिका, शोकात्मिका, प्रहसन इ. प्रकारांच्या प्रकृतींनुसार घटनांची निवड केली, तरी त्यांतून नाट्यानुभव आविष्कृत झाला पहिजे. नाटकाच्या कथानकात गुंतागुंत, निरगाठ व उकल अशा कथानकाच्या तीन अवस्था प्रत्ययास याव्यात,असेही म्हणता येईल किंवा प्रेक्षकांना सतत उत्कंठा वाटेल अशी ही कथारचना करता येईल. जिज्ञासा, उत्कंठा आणि विस्मययांवर कथानक आकारलेले असते. संविधानक बांधेसूद असले पाहिजे. ते नाटकांच्या अंकांतून विकसित होते आणि उत्कर्षबिंदूला पाहोचते. संविधानका वाचूनही नाटक सिद्ध होऊ शकेल किंवा विशिष्ट क्रमाने-उदा.,आदी, मध्य व अंत-कथानक विकसित न करताही नाटककार नाटक लिहू शकेल.कथानकापेक्षा व्यक्तिरेखा महत्त्वाच्या असतात. घटना काही स्वयंभू नसतात.परस्परविरोधी प्रवृतींच्या व्यक्तींच्या क्रियाप्रतिक्रियांतून प्रसंग निर्माण होतात. एखाद्या वेळी एकाच व्यक्तीच्या मनातील परस्परविरोधी प्रवृत्तींतूनही घटना निर्माण होतात. व्यक्ती याच प्रसंगाच्या कारक शक्ती होत. नाटककार कृति-उक्तींच्या द्वारा व्यक्ती उभ्या करतो. कधी तो एकच व्यक्ती केंद्रस्थानी मानून त्या व्यक्तीच्या इतर व्यक्तींशी असलेल्या अर्थपूर्ण संबंधांतून नाट्य आविष्कृत करील, तर कधी व्यक्तिसमूहाच्या व्यवहारातील नाट्याचा वेध घेईल,कधी व्यक्तीच्या बाह्यविश्वाचे त्याच्या अंतर्विश्वाशी असलेले अर्थपूर्ण नाते विशद करील.सरळरेषेत जाणाऱ्या ठसठशीत व्यक्तिरेखांपेक्षा कित्येकदा गुंतागुंतीचे व्यक्तिमत्त्व असलेल्या व्यक्तिरेखा प्रभावी ठरतात. नाटकातील व्यक्तिरेखा प्रतीकात्म असू शकेल किंवा विशिष्ट प्रवृत्तीचा निदर्शक असा व्यक्तिनमुना असू शकेल, किंवा प्रातिनिधिक असू शकेल. याशिवाय नाटकातील व्यक्तिरेखा सपाट किंवा गोलाई असलेल्या असू शकतात. अभिप्रेत नाट्यानुभ व आविष्कृत व्हावा, म्हणून वेगवेगळ्या आविष्कारशैलींचा उपयोग केला जातो. या आविष्कारशैलीचा संबंध नाटकाच्या प्रकृतीशी प्रामुख्याने असतो व कालमानानुसार रंगमंचाच्या उपलब्ध सामग्रीनुसारही शैली नियंत्रित होते. संदर्भ:- कृ. रा. सावंत-"नाट्यचर्या",मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई.
२. कलाकारांचा संच किंवा समूह : नाटक रंगभूमीवर आणण्यासाठी आवश्यक तो अभिनेत्यांचा संच असावा लागतो .